वर्ग ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती
परीक्षा फेब्रुवारी. २०२३
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बॅंक
खात्याची माहिती भरणेबाबत सूचना
प्राप्त ! परीक्षा परिषद पुणे
Scholarship Exam Bank:- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) फेब्रुवारी 2023 मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याची माहिती भरणेबाबत.....
उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) फेब्रुवारी 2023 चा अंतिम निकाल
दिनांक 13/07/2023 रोजी जाहीर झाला आहे. सदर परीक्षेत शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या बँक खात्याची माहिती ऑनलाईन भरणेसाठी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
तरी सदरबाबत आपणास शिष्यवृत्ती परीक्षा 2023 साठी देण्यात आलेल्या लॉगीनमध्ये आपल्या जिल्हा / तालुका / वार्डामधील बँक खात्याची माहिती भरलेल्या / न भरलेल्या शाळांची / विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील माहिती न भरलेल्या शाळांना आपल्यास्तरावरून आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या बँक खात्याची अचूक माहिती दि. 31/07/2023 रोजीपर्यंत भरणेबाबत आदेशित करावे..
बॅंक खात्याची माहिती भरणे
शाळेची Login करा
शाळेची Login
° शाळेची लॉगिन झाल्यावर विद्यार्थ्यांची यादी समोर दिसेल
° जे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक आहे त्या विद्यार्थ्यांसमोरील Final Result रकान्यात View वर क्लिक करा
° आता आपल्या समोर
सदर विद्यार्थी हा शिष्यवृत्तीधारक झाला असल्याने शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यासाठी विद्यार्थ्याच्या आधारकार्डशी सलग्न बँक खात्याची व आधारकार्डची माहिती भरणे आवश्यक आहे. माहिती भरल्यानंतरच सदर विद्यार्थ्याचा अंतिम निकाल पाहता व डाऊनलोड करता येईल. आधारकार्डशी सलग्न बँक खात्याची व आधारकार्डची माहिती भरण्यासाठी Fill details या बटनावर क्लिक करावे अन्यथा Back बटनावर क्लिक करावे.
अशी सूचना येईल त्यानंतर Fill Details या बटनावर क्लिक करुन माहिती भरा व Save करावे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे
आपली प्रतिक्रिया व सूचना