Ads Area

Mahajyoti MHT CET JEE NEET Yojana Free Tab And Six GB Day Internet Data

महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत

टॅब व 6 GB Day इंटरनेट डाटा

मिळणार! असा करा अर्ज

 MHT-CET/JEE/NEET 2025 योजनेचा सुधारित तपशील

Mahajyoti Yojana :-  महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती- विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MIIT-CET/JEE/NEET 2025 करीता पूर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. 


महाज्योती मार्फत MHT-CET/JEENEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.

अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता:

1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.

3. विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा. 

4. जे विद्याथ्यों सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 11 वी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र (बोनाफाईट सर्टिफिकेट) व 10 वी ची गुणपत्रिका जोडावी.

ब. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

1. 10 वी ची गुणपत्रिका 

2. 11 विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचे प्रवेशपत्र (बोनाफाईट सर्टिफिकेट)

3. आधार कार्ड

4. जातीचे प्रमाणपत्र

5. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

क. अर्ज कसा करावा.

1. महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील "Application for MHT-CET/JEE/NEET 2025 Training" यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा

खालील लिंक वर क्लिक करा

       ऑनलाईन अर्ज करा

2. अर्जासोबत 'च' मध्ये नमुद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.

ड. अटी व शर्ती :

1. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31/08/2023 आहे.

2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

4. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संर्पक क्र 0712-2870120/21 E-mail Id : mahajyotijeeneet24@gmail.com

(राजेश खवले)

व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, ( महाज्योती) महाराष्ट्र राज्य, नागपूर

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती

What's Up Group Join

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad