Ads Area

STARS Project Baseline Test Instructions For Mathematics Teachers

STARS' प्रकल्पांतर्गत

पायाभूत चाचणी २०२३-२४

गणित शिक्षकांसाठी सूचना

Baseline Test Mathematics

भूमिका व दृष्टिकोनातील बदल :

राज्यस्तरावरून 'STARS' प्रकल्पांतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित चाचणी १ व संकलित चाचणी २ अशा तीन चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. इयत्ता तिसरी ते आठवी पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुरूप अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही, याची तपासणी या चाचण्यांद्वारे करता येईल.

या चाचण्यांद्वारे विदयार्थी संपादणुकीचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करून गुणवत्ता समृद्धीसाठी आवश्यक उपाययोजना करणे तसेच शाळाधारित मूल्यांकन प्रक्रियेचे बळकटीकरण करणे हा उद्देश आहे.

यानुसार राज्यस्तरावरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती आधारित इयत्ता तिसरी ते आठवीच्या विदयार्थ्यांची पायाभूत चाचणी घेण्यात येत आहे. सदर चाचणीचा मुख्य उद्देश, विदयार्थ्यांनी आधीच्या इयत्तांमधील अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत, हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.

चाचणीचे स्वरूप :

पायाभूत चाचणी ही अध्ययन निष्पत्तीवर आधारित असून ती इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक, तोंडी व लेखी स्वरूपाची आहे.

• पायाभूत चाचणी विकसित करताना मागील इयत्तांच्या विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती/क्षमता विचारातघेतल्या आहेत.

चाचणी नियोजनकरिता सूचना :

• पायाभूत चाचणीचे पूर्वनियोजन, प्रत्यक्ष चाचणी घेणे आणि माहितीचे संकलन अशा तीन टप्प्यांचे नियोजन शिक्षकांनी इयत्तानिहाय व विषयनिहाय करावे.

प्रात्यक्षिक/तोंडी परीक्षेसाठी लागणारे साहित्य शिक्षकांनी चाचणी सुरू करण्यापूर्वी तयार ठेवावे.

विदयार्थी संख्येनुसार वेळेचे नियोजन करावे.

● प्रात्यक्षिक/तोंडी व लेखी परीक्षेसाठी विदयार्थ्यांना पुरेसा वेळ दयावा.

विदयार्थ्यांना प्रश्नाचे आकलन न झाल्यास शिक्षकांनी त्यांना प्रश्न समजण्यासाठी साहाय्य करावे; 

मात्र उत्तराचा संकेत देऊ नये.

• संबंधित वर्गाच्या गणित विषय शिकविणाऱ्या शिक्षकांनीच ही चाचणी विदयार्थ्यांकडून सोडवून घ्यावी.

• चाचणी तपासताना प्रश्नांचे गुण पूर्णांकात दयावे. अर्धा गुण देऊ नये.

प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेची उत्तरे व कृतीसाठी वेगळा कागद वापरून त्यात विदयार्थ्यांना आपले प्रतिसाद नोंदवण्यास सांगावे.

• इयत्ता ३ री ते ५ वी साठी M/P1 ते M/P10 या प्रश्नांच्या समोरील चौकटीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादानुसार [0] किंवा [1] अशाप्रकारे गुण दयावेत व एकूण १० पैकी प्राप्त गुण लेखी परीक्षेसाठी दिलेल्या तक्त्यात नोंदवायचे आहेत.

• इयत्ता सहावी ते आठवीसाठी M1 ते M5 हे तोंडी प्रश्न आहेत, P1 ते P5 हे प्रात्यक्षिक प्रश्न आहेत.

चाचणीनंतर :

१) चाचणीची उत्तरपत्रिका तपासल्यानंतर विदयार्थ्यांच्या गुणांची नोंद गुणनोंदणी तक्त्यात करावी.

२) गुणनोंदणी तक्त्यातील गुणांचे विश्लेषण करावे.

३) ज्या क्षेत्रांत/क्षमता/अध्ययन निष्पत्तीमध्ये विदयार्थी मागे पडलेले आढळतील त्या विदयार्थ्यांसाठी गरजेनुसार कृती कार्यक्रमांची निर्मिती व अंमलबजावणी करावी.

४) ज्या अध्ययन निष्पत्तीमधील विदयार्थ्यांची संपादणूक कमी आढळेल त्या घटकांचा पुनअध्यापन, सराव व उजळणी करून घ्यावी.

गुण नोंद तक्ते डाऊनलोड करा 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे

What's Up Group Join

मराठी शिक्षकांसाठी सूचना

गणित शिक्षकांसाठी सूचना

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad