राज्यातील सर्व शाळेत
इ.३री ते ८वी विद्यार्थ्याकरिता
पायाभूत चाचणी २०२३-२४ चे
आयोजन ! SCERT Pune
Baseline Test 2023 :- STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) पायाभूत चाचणी २०२३-२४ चे आयोजन माहे ऑगस्ट २०२३ तिसरा आठवड्यात करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने इयत्ता ३ री ते ८ वी तील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्याकरिता आयोजन करण्यात येणार आहे.
याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत इयत्ता ३ री ते ८ वी तील विद्यार्थ्याकरिता प्रथम भाषा, गणित, व तृतीय भाषा ( एकूण १० माध्यम ) चाचणी साहित्य ( प्रश्नपत्रिका, शिक्षक सूचना व उत्तरसूची) ची निर्मिती व छपाई करण्यात आली आहे.
सदर साहित्याची राज्यस्तर ते तालुकास्तर वाहतूक संदर्भ क्र.४ अन्वये मान्य निविदा धारक यांचे मार्फत सदर साहित्याची वाहतूक तालुकास्तरापर्यंत करण्यात येणार आहे.
तरी संदर्भ क्र.४ नुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातील तालुका समन्वयकांची यादी आणि जिल्हा, तालुकानिहाय साहित्य यादी जोडली आहे.
तरी तालुका स्तरावर नियुक्त केलेल्या समन्वयकांमार्फत सदर साहित्य ताब्यात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय शाळांना चाचणी साहित्य त्वरित वितरीत करणेत यावे व आपल्या अधिनिस्त गटशिक्षणाधिकारी/तत्सम अधिकारी यांचे मदतीने तत्काळ चाचणी साहित्य शाळांपर्यंत पोहोचविणे संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी.
माहे ऑगस्ट २०२३ च्या तिसरा आठवड्यात नियतकालिक मूल्याकन चाचणी (PAT) अंतर्गत - पायाभूत चाचणी २०२३ - २०२४ चे नियोजन असल्याने वेळेची मर्यादा लक्षात घेता प्रथम प्राधान्याने चाचणी साहित्याच्या वितरणाचे काम हाती घेण्यात यावे.
सदर साहित्य वितरणाचा अहवाल दप्तरी जतन करून ठेवावे , असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे


उपयुक्त उपक्रम गुणवत्ता वाढीसाठी. .शासनाचे अभिनंदन. .
ReplyDelete2023-2024 class 8 math che answer key
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना