Ads Area

STARS Project PAT Evaluation Test Guidence

STARS प्रकल्प अंतर्गत संकलित

मूल्यमापन चाचणी बाबत मार्गदर्शन 


STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) आयोजनाबाबत.....

संदर्भ : १. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्प मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१.

२. राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching – Learning And Results for States) केंद्र पुरस्कृत प्रकल्प राज्य अनुदान वितरण वित्तीय नियमावली मार्गदर्शक तत्वे.

३. STAR प्रकल्प अतर्गत मंजूर PAB मिटिंगचे इतिवृत्त, दि. ३ मे २०२३

वरील विषयान्वये संदर्भ क्र. २ नुसार STARS प्रकल्प मधील SIG २ ( Improved Learning Assessment systems ) २.२ अंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. 
यास अनुसरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन नियतकालिक चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. 

एकूण दहा माध्यमात चाचणी होईल.

 प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या तीन विषयांची इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

यास अनुसरून राज्यातील इयत्ता तिसरी ते आठवी च्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (विद्यानिकेतन/सराव पाठशाळा, समाजकल्याण विभाग (शासकीय), आदिवासी विकास (शासकीय), जिल्हा परिषद, मनपा, नपा, नप, शासकीय सैनिकी शाळा, कटक मंडळ, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल) या शाळांमधील
विद्यार्थ्याच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. 
यासाठी आवश्यक चाचण्यांचा पुरवठा राज्यस्तरावरून करण्यात येणार आहे.

तथापि सदर चाचण्या अंतर्गत पायाभूत चाचणी दिनांक १७.०८.२०२३ ते १९.०८.२०२३ या कालावधीत घेण्यात आलेली आहे. 

तर संकलित मूल्यमापन चाचणी सत्र १ व संकलित मूल्यमापन चाचणी सत्र - २ यांचे खालील प्रमाणे आयोजन करण्यात येणार आहे.

चाचणी कालावधी

संभाव्य कालावधी

१) संकलित मूल्यमापन चाचणी सत्र १:

माहे ऑक्टोबर २०२३ शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबर पहिला आठवडा २०२३ .

२) संकलित मूल्यमापन चाचणी सत्र २

एप्रिल २०२४ पहिला / दुसरा आठवडा

संकलित मूल्यमापन चाचणीचा अभ्यासक्रम:

१. संकलित मूल्यमापन सत्र १ 

प्रथम सत्रातील अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.

२. संकलित मूल्यमापन सत्र २ 

द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.

तरी उपरोक्त प्रमाणे सन २०२३- २४ या शैक्षणिक कालावधीत इयत्ता ३ री ते ८ वी च्या इयत्तांसाठी तीन चाचण्या घेण्यात येणार आहेत. 

संकलित मूल्यमापन चाचणी सत्र १ व २ या संकलित मूल्यमापन चाचणीच्या अनुषंगाने आहेत. 

यामुळे शाळांनी इयत्ता ३ री ते ८ वी (प्रथम भाषा, गणित व इंग्रजी) या विषयांच्या संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ पुन्हा नव्याने घेवू नयेत. 

उपरोक्त चाचणीत मिळालेले गुण हे संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण समजण्यात यावेत. या चाचण्यांची गुणनोंद सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदवहीमध्ये घेण्यात यावी. 

तसेच इतर विषयांच्या चाचण्या शिक्षकांनी आपल्या स्तरावर राज्यस्तर चाचणीच्या धर्तीवर तयार करून संकलित १ व २ चे मूल्यमापन करावे.

शिक्षण क्षेत्रातील नवीन नवीन अपडेट करिता, शिक्षक, विद्यार्थी पालक करिता

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad