इ. ५ व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२४
करिता ऑनलाईन आवेदन अर्ज
भरण्यास मुदतवाढ ! Msce Pune
Scholarship Exam 2024 Pune :-
शासनमान्य शाळांमधून सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या वेबसाईट वर आहे
परीक्षा आवेदन अर्ज करण्याची मुदतवाढ
उपरोक्त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक ०१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती.
तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक १५ डिसेंबर, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दिनांक १५ डिसेंबर, २०२३ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी
शाळेची नोंदणी
खालील लिंक वर क्लिक करा
शाळेची Login
शाळेची नोंदणी झाल्यावर लॉगिन करा
खालील लिंक वर क्लिक करा
https://www.mscepuppss.in
या संकेतस्थळावर दिनांक ०१/०९/२०२३ रोजी पासून ते दिनांक १५ डिसेंबर २०२३ उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
अ. | तपशील | डाऊनलोड |
1. | वर्ग पाचवी परीक्षा शुल्क | |
2. | अधिसूचना | |
3. | वर्ग आठवी परीक्षा शुल्क | Download |
खालील लिंक वर क्लिक करून नमुना फार्म डाऊनलोड करा
दिनांक ३१/१२/२०२३ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वानी गांभीर्याने नोंद घ्यावी.
उपरोक्त परीक्षा दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल.
परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
सोबत :- अधिसूचना
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ०४
आपली प्रतिक्रिया व सूचना