Teacher Online Mathematics Webinar

सर्व व्यवस्थापनाच्या शाळा मधील शिक्षकांनी गणित विषयाच्या अनुषंगाने ऑनलाईन गणित वेबिनार सत्रासाठी उपस्थित राहणे बाबत

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा मधील गणित अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व खान अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने गणित विषयासाठी ऑनलाईन गणित वेबिणार सत्राचे आयोजन दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत करण्यात आले आहे. 

सदर वेबिणार सत्रामध्ये गणित विषयाचे अध्यापन प्रभावी व परिणामकारक होण्यासाठी पुढील बाबीचा समावेश करण्यात आला आहे.

• महाराष्ट्र शासन व खान अकॅडमी सहकार्यात्मक भागीदारी

• राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद व खान अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेला गणित साहित्याचे शिक्षकाकडून उपयोजन

• शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या दृष्टीने खान अकॅडमी कडून सहकार्य व आवश्यक तयारीसाठी मार्गदर्शन

• विद्यार्थी संपादनुकीचे मूल्यांकन

• मुख्याध्यापक शिक्षक भूमिका

सदर ऑनलाईन वेबिनार सत्रा बाबतची माहिती आपल्या अधिनस्त असलेल्या तालुक्यातील/मनपा क्षेत्रातील, शिक्षण विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यापर्यंत पोहोचविण्यात यावी तसेच सदर ऑनलाईन वेबिनार सत्रास संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहणे बाबत निर्देशित करण्यात यावे.

सदर ऑनलाईन वेबिनार सत्राची युट्युब लिंक पुढीलप्रमाणे 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad