वर्ग 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025
गुणवत्ता यादी जाहीर ! Msce Pune
पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी), दि. 09 फेब्रुवारी, 2025
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत रविवार दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8. वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या बुधवार दिनांक 09 जुलै, 2025 रोजी सायं 06.00 वाजता परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. सदर परीक्षेची सांख्यिकीय माहिती खालीलप्रमाणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी)
दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल दिनांक 25/04/2025 रोजी जाहीर करण्यात आला होता. दिनांक 25/04/2025 ते 04/05/2025 या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागविण्यात आले होते. या कालावधीत प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.
➤ खालील लिंक वर क्लिक करा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे
What's Up Group Join
➤ What's Up Group Join



आपली प्रतिक्रिया व सूचना