MAHA TET महाराष्ट्र शिक्षक पात्रता
परीक्षा 2026 ! वेळापत्रक जाहीर
MAHATET 2026 :- शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) - २०२६ परीक्षेचे रविवार दि. २१.०६.२०२६ रोजी आयोजन केले आहे.
इ. १ ली ते ५ वी (पेपर १) व इ. ६ वी ते इ. ८ वी (पेपर २) साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी सदर संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया दि. २७.०३.२०२६ पासून सुरु होत असून दि. १६.०४.२०२६ पर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येतील. संबंधित परीक्षार्थ्यांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी.
➤ ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी
कालावधी दिनांक २७.०३.२०२६ ते दिनांक १६.०४.२०२६
➤ प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढुन घेणे
दिनांक ०९.०६.२०२६ ते दिनांक २१.०६.२०२६
➤ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर। दिनांक व वेळ
रविवार दिनांक २१.०६.२०२६ वेळ १०.३० AM ते १३.०० PM
➤शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक व वेळ
रविवार दिनांक २१.०६.२०२६ वेळ १४.३० PM ते १७.०० PM
काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे
Mission TET 2026
यावेळी TET निकाल नक्कीच आपलाच
TET पास व्हायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघाच.
# TET नियोजन संपूर्ण विश्लेषण
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - 2026
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 04
What's Up Grotup Join
➤ What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना