Senior And Selection Grade Training Online Apply Registration Information

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६

ऑनलाईन नावनोंदणी मुदतवाढ ! नोंदणी

पद्धती सविस्तर जाणून घ्या 

प्रशिक्षण नोंदणी दिनांक २०.०४.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक १२.०५.२०२६ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत पर्यंत सुरु राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

उपरोक्त संदर्भा क्र. २ च्या पत्रानुसार वरिष्ठ व निवड प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करणे करिता पोर्टल दिनांक २०.०४.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक २९.०४.२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत सुरु राहणार होते. परंतु काही प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी त्यांच्याकडे आलेल्या शिक्षकाच्या मागणी नुसार पोर्टलवर नावनोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार वरिष्ठ व निवड प्रशिक्षण नावनोंदणीस मुदतवाढ देण्यात येत असून पात्र शिक्षकांना आपली नावनोंदणी पोर्टल दिनांक १२.०५.२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० पर्यंत सुरु करता येईल.

उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षकांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावी.


दिनांक २० जुलै २०२१ च्या शासननिर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होणेकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.