शाळा पूर्वतयारीअभियान २०२६
मेळावा आयोजित! अमंलबजावणी
शाळास्तरावरील पहिल्या मेळावा भेटी संदर्भातील माहितीची नोंद
शाळा परिसरातील माता पालक यांचे मार्फत बालकांच्या पूर्वतयारीचा प्रत्यक्ष आढावा घेवून व त्याचे निरीक्षणाची नोंद
दुसऱ्या मेळाव्याच्या वेळी नमुना आधारित मूल्यांकन (SBA) 7-10 दाखलपात्र मुलांची विकासपत्र मधील पहिल्या मेळाव्याची आणि दुसऱ्या मेळाव्याची माहितीची नोंद, अशा प्रकारे तिन्ही प्रकारच्या नोंदी भराव्यात.
५. मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना
#Shalapurva Tayari Abhiyan२०२६,
#शाळापूर्वतयारीअभियान २०२६
या हॅशटॅगचा (#) उपयोग करावा. तसेच मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT, महाराष्ट्रच्या http://www.facebook.com/Mahascert या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे.
६. जिल्ह्यातील शाळापूर्व तयारी अभियान २०२६-२७ पूर्ण झाल्यानंतर उपक्रमाच्या अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे मार्फत प्रस्तुत कार्यालयास सादर करण्यात यावा.
क) शाळा स्तरावरील अंमलबजावणीचे स्वरूप
१. मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे, याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी एक / दोन दिवस मेळाव्याबाबत वस्ती, गाव स्तरावर प्रभातफेरी, दवंडी देवून, समाजमाध्यमांचा उपयोग करून जनजागृती करण्यात यावी व त्यामाध्यमातून इयत्ता पहिलीतील दाखलपात्र सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे.
२. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४ तासांचा असावा.
३. शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी.
४. शाळास्तरावर दिनांक २७ एप्रिल ते १ मे २०२६ दरम्यान कोणत्याही एका तारखेस शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ चे आयोजन करण्यात यावे, त्याप्रमाणे सात टेबल व आवश्यक साहित्यासह मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे.
५. शाळास्तरावरील मेळाव्यासाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी, प्राचार्य, DIET, शिक्षणाधिकारी तसेच तालुकास्तरावरील शिक्षणक्षेत्रातील अधिकारी यांना प्रत्यक्ष शाळेवर शाळापूर्व तयारी मेळाव्याच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करावे.
६. दाखल पात्र विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन विकास पत्राची प्रिंट किंवा झेरोक्स काढाव्यात. प्रत्यक्ष मेळाव्याच्या वेळी दाखल पात्र बालकांची विकासपत्रातील सर्व विकासाची स्थिती नोंदवून पालकांकडे देण्यात यावे.
७. उपक्रमाच्या अनुषंगाने यापूर्वी अंमलबजावणी केल्यानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकान्यात करण्यात याव्यात.
८. शाळास्तरावर व परिसरातील उपलब्ध साधनांचा मेळाव्यामधील ७ स्टॉल्ससाठी वापर करण्यात यावा.
पहिल्या मेळाव्यानंतर दाखलपात्र बालकांच्या मातांचे वाडी वस्तीनिहाय माता-पालक गट तयार करावेत. यासाठी यापूर्वी निपूण अंतर्गत तयार केलेल्या माता पालक गटातील सक्रीय लीडर मातांना देखील सहभागी करून घेण्यात यावे.
यावर्षी शाळापूर्व तयारी अभियान बदललेले स्वरूप जाणून घेण्यासाठी सोबत व्हिडिओचा QR code देण्यात आलेला आहे. तो काळजीपूर्वक पहावा.
११. SCERT च्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले साप्ताहिक आयडिया व्हिडिओ आणि अॅक्टिव्ह वर्कशीट या गटांना WhatsApp समूहाद्वारे आठवड्याच्या सुरुवातीला पाठविण्यात यावेत.
१२. प्रत्येक माता-पालक गटातील लीडर मातेस संबंधित गटाचे सोयीनुसार आठवड्यातून किमान एक तास एकत्र येऊन आठवड्वासाठी दिलेल्या साप्ताहिक आयडिया व्हिडिओ आणि अॅक्टिव्ह वर्कशीट पाहून गटात चर्चा करण्यात यावी.
१३. दोन्ही मेळाव्यादरम्यानच्या कालावधीत इयत्ता पहिलीत दखलपात्र असलेल्या मुलांचे पालक / माता यांनी आयडिया व्हिडिओ व अॅक्टिव्ह वर्कशीट मदतीने साप्ताहिक बैठकीतील मार्गदर्शनानुसार घरी
आपल्या पाल्यांकडून करून घ्याव्यात.
बालतिक्षण विभाग-नाकापूर्व तयारी अभियान
१४.शाळास्तरावर दिनांक १५ जून ते २० जून २०२६ दरम्यान कोणत्याही एका तारखेस शाळापूर्व तयारी मेळावा क्र. २ चे आयोजन करण्यात यावे.
१५. शाळास्तरावरील पहिल्या व दुसऱ्या मेळाव्याची सांख्यिकीय माहिती संकलित करण्यासाठी बालशिक्षण विभाग व प्रथम संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या वेबपोर्टलच्या
https://gpconnect.prathaminsights.in/gp/MH/home/sim
वापर करण्यात यावा.
१६. मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना
#Shalapurva Tayari Abhiyan२०२६, #शाळापूर्वतयारीअभियान२०२६
या हॅशटॅगचा (#) उपयोग करावा. तसेच मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT, महाराष्ट्रच्या http://www.facebook.com/Mahascert या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे.
१७. दुसरा मेळावा झाल्यावर पहिलीत दाखलपात्र बालकांच्या मातांना निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत कार्यस्त माता पालक गटांमध्ये समावेश करून माता गटांची पुनर्बाधणी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी करण्यात यावी.
करिता आपल्या स्तरावरून आपले अधिनस्त कार्यालयास या अभियानाची वरीलप्रमाणे अंमलबजावणी करण्याविषयी सुचित करण्यात यावे.

आपली प्रतिक्रिया व सूचना