Most Useful Computer keyboard shortcuts
💻 कॉम्प्युटरच्या कि-बोर्ड वरच्या
शॉर्टकटची ही आहे कमाल!*
⌨️ आज संपूर्ण जग हे टेक्नोसॅव्ही झाले आहे. अगदी लहान मुलापासून प्रत्येकाला कीबोर्ड माहित असतो आणि कॉम्प्युटरवर होणाऱ्या गोष्टीही माहित असतात.
🖱️ एक काळ असा होता की, कॉम्प्युटरचा माऊस हा शोधलेलाच नव्हता. त्यामुळे प्रत्येक काम हे कि-बोर्डवर चालत असे. आज आपण पाहतो की, आपण माउस फिरवला की, आपल्याला हवी ती कमांड आपण कम्प्युटरला देऊ शकतो.
🖥️ कॉम्प्युटर हा माऊस मुळे जास्त सोपा झाला. मात्र जी माऊस नव्हते तेव्हा कि-बोर्डवर अशा काही शॉर्टकट चा शोध लावण्यात आला होता की, माउसची गरज त्या काळी लोकांना भासत नसे.
🧐 *चला तर मग जाणून घेऊयात अशाच काही युक्त्या ज्या आपल्यासाठी उपयुक्त ठरतील!*
▪️ विंडोजवर अंकांचा वापर करतात ते जाणून घेण्यासाठी आपल्याला कीबोर्डचे ज्ञान व्यवस्थित असणे गरजेचे आहे.टास्कबार मध्ये बरेच प्रोग्राम असतात. त्यांना उघडण्यासाठी आपल्याला माऊसची गरज पडते. मात्र, माउसशिवाय कीबोर्डवर कोणते अंक दाबून आपण ते प्रोग्रॅम उघडू शकतो हे माहित असणे म्हणजे खरी ट्रिक आहे.
▪️ विंडोज की दाबून कीबोर्ड मध्ये दिलेले वरील कोणतेही अंक दाबले की ट्रान्सफर मध्ये ठेवलेले प्रोग्रॅम एकेक करून उघडायला सुरुवात होते.तुम्ही ज्या क्रमाने हे प्रोग्राम आधी उघडले होते त्या क्रमाने टास्कबारचा वापर करून तुम्हाला हे प्रोग्रॅम दिसायला लागतील.
▪️ एखादा प्रोग्राम जर तुम्हाला मिनिमाईज किंवा माझे माहित करायचा असेल तरीदेखील अगदी सोपी ट्रिक आहे. ऍक्टिव्ह विन्डोला नियंत्रित करण्यासाठी विंडोज की दाबून लेफ्ट राईट डाऊन या अॅरो चा वापर करावा.
▪️बऱ्याचदा आपण भरपूर प्रोग्राम उघडून ठेवतो.आणि मग आपलं काम करताना गोंधळून जातो. आपल्याला काम करता करता डेस्कटॉपवर जायचं असेल तर विंडोज डी वापरल्यानंतर तुम्ही लगेच डेस्कटॉप वर जाल.
▪️ काम करता करता आपल्याला एक्सप्लोरर वर जायचं असेल तर विंडोज वापरून तुम्ही जाऊ शकता. तुमच्या समोर विविध फाईल माय कम्प्युटरच्या पर्यायांमधून दिसायला लागतील.
▪️ अनेकदा आपले प्रेझेंटेशन किंवा महत्त्वाची मीटिंग ऑफिसमध्ये सुरू असताना आपल्याला एखादा लॅपटॉप प्रोजेक्ट रुशी कनेक्ट करण्यासाठी पटकन हवा असलेला शॉर्टकट म्हणजे विंडोज सह पी दाबणे. असं केल्याने, तुम्हाला तुमचा लॅपटॉप कोणत्याही मोठ्या स्क्रीनची सहजपणे कनेक्ट करता येतो तो एखाद्या प्रोजेक्टर बरोबर तुम्ही कनेक्ट करू शकता.
▪️ तुम्ही कीबोर्ड हाताळायला सुरुवात केली अशाच प्रकारच्या अनेक गमतीजमती तुम्हाला कळून येतील आणि कॉम्प्युटरचा वापर हा अधिक जास्त युजर फ्रेंडली व्हायला मदत होईल.


आपली प्रतिक्रिया व सूचना