मुख्याध्यापकांसाठी शालेय नेतृत्व ,
व्यवस्थापन PSLM
प्रति,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक,माध्यमिक व निरंतर)
जिल्हा परिषद,सर्व.
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा),
औरंगाबाद.
विषय :- मिपा संस्थेच्या राप्य महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त निपुण स्मरणिका प्रकाशन कार्यक्रमास मा.मंत्री.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय, मुंबई यांच्या उपस्थितीबाबत.
संदर्भ :- मा.ना.वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,महाराष्ट्र शासन यांनी उद्घाटन
कार्यक्रमास उपस्थितीबाबत दिलेली मान्यता दिनांक 11/11/2020.
महोदय,
उपरोक्त विषयान्वये सविनय सादर करण्यात येते की, महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद ही महाराष्ट्र शासनाची राज्यस्तरीय स्वायत्त संस्था आहे.
या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील मुख्याध्यापकांपासून ते गट, जिल्हा, विभाग, राज्य व मंत्रालय पातळीवरील अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शासन पत्र दिनांक 5 जानेवारी, 2017 नुसार या संस्थेस राज्याची - School Leadership Academy म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्या
संस्थेमार्फत नेतृत्व विकास व क्षमता संवर्धनाचे राज्यव्यापी कार्यक्रम कार्यान्वित करण्यात येतात.
मिपा संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयेजन संस्थेमार्फत सुरु आहे.
दिनांक 03 डिसेंबर, 2020 रोजी मुख्याध्यापकांसाठी शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन (PSLM) आणि अधिकान्यांसाठीच्या नेतृत्व संवर्धन आणि शैक्षणिक विकास (LEAD) या प्रशिक्षणाची नोंदणी सुरु झालेली आहे.
रोष्यमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त "निपुण" ई-स्मरणिका प्रकाशन व LEAD कार्यक्रमाची सुरुवात हा उद्घाटन समारोह मा.प्रा.वर्षाताई गायकवाड, मंत्री,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय,मुंबई यांचे हस्ते नियोजित असून त्यांचे कडून
दिनांक 22 डिसेंबर,2020 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 ही वेळ मिळाली आहे.
तरी या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमास खालील लिंकट्वारे आपण उपस्थित रहावे व आपल्या अधिनस्त सर्व उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांना लिंकद्वारे उपस्थित होण्याबाबत अवगत करावे.
आपली विश्वासू
Napelsave (डॉ.नेहा बी बेलसरे)
संचालक
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबाद.
प्रत माहितीस्तव सविनय सादर :-
1.मा. अपर मुख्य सचिव,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय,मुंबई- 2.मा.आयुक्त शिक्षण,महाराष्ट्र राज्य, पुणे.
3.मा.राज्य प्रकल्प संचालक,म.प्रा.शि.प.मुंबई तथा मा.संचालक.SCERT.महाराष्ट्र.पुणे.

आपली प्रतिक्रिया व सूचना