राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२०-२१ अंतर्गत स्पर्धकांनी सादरीकरण फेरीसाठी उपस्थित राहणेबाबत...
संदर्भ : १.जा.क्र.राशैसंप्रप/संशोधन/नयोपक्रम स्पर्धा/२०२०-२१/१९४५, दि.१५/१०/२०२०. २.जा.क्र.राशैसंप्रप/संशोधन/नवोपक्रम सार्धा/२०२०-२१/२३७९,दि.२६/११/२०२०.
उपरोक्त विषयानुसार संशोधन विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत पाच गटामध्ये राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२०-२१ चे आयोजन करण्यात आले असून या राज्यस्तरीय स्पर्धेचे गट १ ते ५ साठीचे पहिल्या टप्प्यातील मूल्यांकन जिल्हा व विभाग स्तरावर पूर्ण करण्यात आले आहे.
त्यानुसार राज्यस्तरावर प्राप्त झालेल्या नवोपक्रमांची
राज्यस्तरावरील पहिल्या फेरीतील (अहवाल परीक्षण) मूल्यांकन पूर्ण झाले आहे.
पहिल्या फेरीतील प्रत्येक गटातील उत्कृष्ट १० नवोपक्रमांची दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
दुसऱ्या फेरीतील मूल्यांकनासाठी स्पर्धकांचे झुम मिटिंगद्वारे ऑनलाईन सादरीकरण घेण्यात येणार आहे.
सदर सादरीकरण फेरी प्रत्येक गटासाठी एक दिवस याप्रमाणे
दिनांक ४ व ५ फेब्रुवारी २०२१ तसेच
दिनांक ८ ते १० फेब्रुवारी २०२१ या ५ दिवसाच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे, या सादरीकरण फेरीतील मूल्यांकनासंदर्भात आवश्यक सूचनांसाठी संबंधित स्पर्धकांशी संशोधन विभागामार्फत
भ्रमणध्वनी व Whats App द्वारे संपर्क साधण्यात येईल. याबद्दल आपल्या अधिनस्त स्पर्धकांना आपल्या स्तरावरून
सूचना देण्यात याव्यात.


आपली प्रतिक्रिया व सूचना