Class First To Eight CCE Evaluation Information

वर्ग पहिली ते आठवी 

मूल्यमापन मार्गदर्शन सूचना

 2020 - 2021 

CCE EVALUATION Guideline

प्रगती पत्रक नमुना उपलब्ध करून देण्यात आले आहे
खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा

 शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये इ. १ ली ते ४ थी च्या शाळा सुरु करता आल्या नाहीत व इ. ५ वी ते ८ वी च्या शाळांमध्ये कमी कालावधीकरिता प्रत्यक्ष वर्गाध्यापन शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शासन, शाळा स्तरावरून विविध स्वरूपाचे प्रयत्न केले गेले आहेत व अद्याप देखील ते सुरू आहेत.


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने दिक्षा अॅप (DIKSHA) आधारित "शाळा बंद.....पण शिक्षण आहे" या अभ्यासमालेच्या सहाय्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना रोज एका विषयाचा घटक देऊन शिकणे सुरू राहावे म्हणून प्रयत्न केले गेले. त्याच बरोबर शैक्षणिक दिनदर्शकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठीचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच अभिनव उपक्रमातून उदाहरण गली गली सिम सिम, टिलीमिली, ज्ञानगंगा अशा शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण दूरदर्शनच्या डी.डी सह्याद्री मराठी वाहिनीवरून सुरू आहे.

 व अद्याप देखील ते सुरू आहेत.

तसेच इयत्ता निहाय यु टयुब चॅनल, जिओ टिव्हीच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले जात आहेच, राज्यातील शिक्षकांनी या परिस्थितीत देखील ऑनलाईन, ऑफलाईन स्वरूपात तसेच वाड्या वस्त्यांवर, तांड्यावर प्रत्यक्ष जाऊन विविध उपक्रमांद्वारे शिक्षण सुरू ठेवले आहे. उपरोक्त परिपत्रकांन्वये इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवणेबाबत कळविण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर देखील स्थानिक स्वराज्य संस्थानी आपापल्या परीने विविध उपाययोजना केलेल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शिक्षकांनी इ.१ ली ते ४ थी च्या वर्गाना प्रत्यक्ष वर्गात अध्यापन केलेले नसले तरी इतर साधने व तंत्राचा अध्यापनाकरिता निश्चित उपयोग केलेला दिसून येत आहे. याचसोबत इ.५ वी ते ८ वी च्या शाळा राज्यात सुरु केल्या गेल्या आहेत. बहुतांश शाळांमध्ये इ. १ ली ते ८ वी च्या विद्यारथ्यांचे आकारिक मूल्यमापन केले गेले आहे व काही शाळांमध्ये संकलित मूल्यमापन देखील केले गेले आहे.

उपरोक्त बाबींचा विचार करून संदर्भ क्र. ५ अन्वये शासनाने शैक्षणिक वर्ष २०२० २१ मधील इ. १ ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ कलम १६ अन्वये वर्गोन्नती देण्यास मान्यता दिली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ.१ ली ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांच्या वर्गोन्नतीबाबत राज्याचे शैक्षणिक प्राधिकरण म्हणून असलेल्या अधिकाराचा वापर करून खालील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

मूल्यमापन मार्गदर्शन सूचना

१. शैक्षणिक वर्ष २०२० -२१ मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे  आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत संदर्भ क्र. २ अन्वये नमूद नियमित कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात यावा.ज्या शाळेत आकारीक व संकलीत मूल्यमापन केलेले आहे त्यांनी नेहमीप्रमाणे निकाल तयार करावे.


२. शैक्षणिक वर्ष २०२० -२१ मध्ये शिक्षकांनी विविध साधन तंत्रांचा वापर करून ज्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबतीत फक्त आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्यांची संपादणूक लक्षात घेता त्याचे रुपांतर १०० गुणांमध्ये करावे व त्यानुसार विद्यार्थ्यांची प्रगती श्रेणी निर्धारित करण्यात यावी.निकाल तयार करावे.


३. शैक्षणिक सत्र २०२० २०२१ मध्ये कोणत्याही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक, संकलित

मूल्यमापन करणे शक्य झालेले नाही अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत संदर्भ क्र. ५ अन्वये ज्या शाळेला वरिलपैकी काहीही केलेले नाही त्यांनी  शासनाने सूचित

केल्यानुसार बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १६ नुसार

पुढील वर्गात वर्गोत्रत करण्यात यावे. अशा विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर

"आर.टी.ई ॲक्ट २००९ कलम १६ नुसार वर्गोन्रत"

 असा शेरा नमूद करण्यात यावा. याव्यतिरिक्त इतर कोणताही शेरा नमूद करण्यात येऊ नये.

४. वरील मुद्दा १ व २ मधील क-२ पेक्षा कमी श्रेणी मिळालेले विद्यार्थी व मुद्दा ३ मधील सर्व विद्यार्थी तसेच बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम चार प्रमाणे वयानुरूप दाखल होणारे विद्यार्थी यांच्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र मार्फत विकसित करण्यात आलेल्या विद्यार्थी मित्र पुस्तिकांची अध्ययन-अध्यापन करिता मदत घेण्यात यावी. तसेच नियमित शैक्षणिक वर्गाअध्यापनाची संपूर्ण प्रक्रिया करण्यात यावी.

५. वरील प्रमाणे कार्यवाही करताना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांचे नव्याने कोणत्याही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन/ ऑफलाईन प्रकारे मूल्यमापन करण्यात येऊ नये.

६. उपरोक्त सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रगतिपुस्तक, संचयी नोंद पत्रक इ. अभिलेखे नियमित वेळेत पूर्ण करण्यात यावेत व स्थानिक परिस्थितीनुरूप वितरीत करण्यात यावेत.

 ७. परीक्षे संदर्भात क्षेत्रीय स्तरावरून मूल्यमापना बाबत इतर कोणत्याही सूचना शाळांना देण्यात येऊ नयेत.

८. सदर सूचना राज्य शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाव्या शाळांना लागू राहतील.

 ९. कोविड- १९ च्या संदर्भात स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात यावे.


कोरोना महामारीच्या काळात शैक्षणिक सत्र २०२० - २०२१ मध्ये विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान

भरून काढण्याकरिता पुढील शैक्षणिक सत्र २०२१-२०२२ मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने कृतीकार्यक्रम विकसित करण्यात येतील. यासंदर्भात सविस्तर सूचना यथावकाश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील,

शासन परिपत्रक


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad