इ. 11 वी CET भरलेल्या आवेदनपत्रातील माहितीमध्ये दुरुस्ती करता येईल !सुविधा उपलब्ध
जाणून घ्या
सन २०२१ २२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (CET) भरलेल्या आवेदनपत्रातील माहितीमध्ये दुरुस्तीबाबत
उपरोक्त विषयाबाबत संदर्भिय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शासन निर्णय
वर्ग ११वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षेचे (CET) आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक २० व २१ जुलै रोजी तसेच दिनांक २४/७/२०२१ पासून आवेदनपत्र स्विकारण्याची कार्यवाही सुरु आहे.
सदर आवेदनपत्रामध्ये माहिती भरताना विद्यार्थ्यांकडून काही चुका झाल्याने त्या दुरुस्त करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी होत आहे. सबब सदर परीक्षेची आवेदनपत्र सादर करताना संगणक प्रणालीमध्ये भरलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा (Form Edit Option)
दिनांक ३१/७/२०२१ (सायंकाळी ५.००) पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सदर सुविधा दिनांक ०२/८/२०२१ (रात्री ११.५९ पर्यंत उपलब्ध असेल.
यानुसार विद्यार्थ्यांना आवेदनपत्रात भरलेल्या माहितीमध्ये पुढं प्रमाणे दुरुस्ती करता येईल.
अ) राज्य मंडळावी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा सन २०२१ मध्ये उत्तीर्ण / प्रविष्ट झालेल्या विद्याथ्र्यांना आवश्यकता असल्यास संगणक प्रणालीतील
खालील माहितीमध्ये बदल किंवा दुरुस्ती करता येईल.
१) Email आयडी, मोबाईल क्रमांक
२) परीक्षेचे माध्यम सेमी इंग्रजीचा विकल्प, सामाजिक शास्त्रे या विषयाच्या प्रश्नांचे माध्यम
३) विद्यार्थ्याचा तात्पुरत्या / कायमच्या निवासस्थानाचा पत्ता व त्यानुसार परीक्षा केंद्रासाठी निवडलेला जिल्हा, तालुका / शहराचा विभाग (WARD)
४) इ.१० वीचे आवेदनपत्र भरताना SEBC प्रवर्गाची नोंद केलेल्या विद्याथ्र्यांच्या बाबतीत शासनाच्या
सुधारित तरतुदीनुसार निश्चित केलेला प्रवर्ग (खुला अथवा EWS प्रवर्ग)
उपरोक्त माहिती व्यतिरिक्त इतर माहिती ही विद्यार्थ्याने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा सन २०२१ साठी शाळेमार्फत भरलेल्या आवेदनपत्रावरुन घेण्यात आलेली आहे.
त्यामुळे सदर माहितीमध्ये बदल असल्यास विद्यार्थ्याने संबंधित शाळेशी त्वरित संपर्क साधावा. याबाबत शाळांना स्वतंत्रपणे सूचना देण्यात आलेल्या आहेत.
ब) राज्यमंडळाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा सन २०२१ पूर्वी उत्तीर्ण/ प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी यांनी संगणक प्रणालीमध्ये आवेदनपत्र सादर करताना भरलेल्या कोणत्याही माहितीमध्ये आवश्यकता असल्यास बदल किंवा दुरुस्ती करता येईल.
Step
विद्यार्थ्यांना उपरोक्तप्रमाणे संगणक प्रणालीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास त्यांनी
- आपला आवेदनपत्र क्रमांक (Application No.) व
- संगणक प्रणालीमध्ये नोंदविलेला मोबाईल क्रमांक वापरून लॉगईन Login करावे
- खालील Login लिंक वर क्लिक करा
- Login केल्यानंतर 3 डॉट वर क्लिक करा
- आता Unlock Application Form For Edit Option वर क्लिक करून भरलेल्या माहितीमध्ये आवश्यक दुरुस्त्या कराव्यात व दुरुस्तीसह फॉर्म सबमिट करावा.
काही विद्यार्थ्यांनी एका पेक्षा अधिक आवेदनपत्रे संगणक प्रणालीमध्ये भरल्याची बाबही निदर्शनास आली आहे. अशा विद्यार्थ्यांनी योग्य ते एकच आवेदनपत्र ठेवून जादाची आवेदनपत्रे Delete करण्याची सुविधा
दिनांक ०१.०८.२०२१ (सकाळी ११.००) पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा विद्यार्थ्यांना अनावश्यक जादा भरलेले आवेदनपत्र Delete पर्यादाचा विकल्प वापरून रद्द करता येतील. मात्र अशा विद्यार्थ्यांनी किमान एक योग्य आवेदनपत्र संगणक प्रणालीमध्ये असल्याची खातरजमा करावी.
सदर सुविधादेखील दिनांक ०२.०८.२०२१ (रात्री ११.५९ पर्यंत) उपलब्ध असेल.
सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, पालक व अन्य संबंधीत घटकांच्या यासंदर्भातील व अन्य शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळामार्फत यापूर्वी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्याचा तपशिल मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तसेच आवेदनपत्र भरण्याच्या संकेत स्थळावर तांत्रिक बाबीसाठी हेल्पलाईन सुविधेचा तपशील उपलब्ध करून दिलेला आहे.
तरी सदर बाब संबंधीत विद्यार्थी, पालक व अन्य घटकांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी. याबाबत राज्यमंडळ स्तरावर प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रकटनाची प्रत सोबत देण्यात येत आहे.
(डॉ. अशोक भोसले)
सचिव, राज्यमंडळ, पुणे ०४
आपली प्रतिक्रिया व सूचना