Ads Area

Teacher Day Thank A Teacher

 Teacher Day 2021
शिक्षक दिना निमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षकांच्या कार्य गौरव सप्ताह साजरा होणार

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अध्ययन अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. 

कालावधी

 अशा सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने 

दिनांक ०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे.

 राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. 

या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे. 

तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.

शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षकांच्या कार्य गौरव  खालील कार्यक्रमांचे

आयोजन करण्यात यावे.

इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी

कार्यक्रमाचे नाव

१. वक्तृत्व

२. चित्र रेखाटन

३. काव्य वाचन
४. निबंध

विषय

1 माझा आवडता शिक्षक

२. शिक्षक दिन

३. मी शिक्षक झालो तर / मी शिक्षिका झाले तर

इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी

कार्यक्रमाचे नाव

१. निबंध लेखन

२. वक्तृत्व

३. स्वरचित कविता लेखन

४. काव्यवाचन

विषय

1.माझा शिक्षक माझा प्रेरक

२. कोविड कालावधीतील शिक्षकांची भूमिका

३. माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान/

उपक्रमशील शिक्षक


इयत्ता नववी ते इयत्ता बारावी

कार्यक्रमाचे नाव

१. निबंध लेखन

२. वक्तृत्व

३. शिक्षकांची मुलाखत
४. काव्य लेखन
५. काव्य वाचन

विषय
१. आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका
२. देशाच्या जडण घडणीमध्ये
शिक्षकांचे योगदान

३. शिक्षक समाज परिवर्तनाचे माध्यम

४. माझ्या शिक्षकाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

हॅशटॅग (#) चा वापर 

उपरोक्त प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाजमाध्यामांवर, Social Media

 Facebook-  @thxteacher, 

Twitter- @thxteacher, 

Instagram- @thankuteacher 

अशा प्रकारे टॅग करुन अपलोड करावेत. यावेळी

#ThankATeacher

#ThankYouTeacher

#MyFavourite Teacher

#MyTeacherMyHero

#ThankATeacher2021

या हॅशटॅग (#) चा वापर करावा.

विद्यार्थ्यांसाठी सूचना

विद्यार्थ्यांनी खालील लिंक वर आपली नोंदणी करावी

आपण केलेल्या पोस्ट ची लिंक नोंदवावी.

          नोंदणी लिंक

• अधिक माहितीसाठी  सदरच्या लिंक वर क्लिक करून अथवा सोबतचा QR कोड स्कॅन करून मार्गदर्शक व्हिडीओ पाहू शकता.

YouTube Link

• नावनोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्याजवळ शाळेचा यु-डायस क्रमांक असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्याचा वैयक्तिक Email नसल्यास पालक, शिक्षक अथवा नातेवाईक यांचा Email विद्यार्थी वापरू शकतात.

• विद्यार्थ्यांनी आपल्या उपक्रमाचा फोटो / व्हिडीओ Social Media समाज माध्यमावर (फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम) पोस्ट करत असताना आपले पूर्ण नाव, स्पर्धेचे / उपक्रमाचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता, शाळेचा यु डायस क्रमांक इत्यादी नमूद करावे.

• आपण आपल्या उपक्रमाची पोस्ट समाज माध्यमा Social Media वर टाकत असताना ती Public करावी. तसेच फेसबुक वर पोस्ट करत असताना ती story मध्ये शेअर न करता Wall वर शेअर करण्यात यावी.

• या कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीवर समाजमाध्यमा Social Media ची लिंक पेस्ट करावी.

आपल्या उपक्रमाचा / कार्यक्रमाचा व्हिडीओ असल्यास तो फक्त २ ते ३ मिनिटांपर्यंतचा असावा तसेच फोटो सुस्पष्ट असेल याची काळजी घ्यावी.

आपण विविध माध्यमांवर उपक्रम शेअर केला असल्यास कोणत्याही एकाच समाज माध्यमाची Social Media लिंक प्रणालीवर पेस्ट करण्यात यावी.

• पोस्ट करत असताना दिलेल्या #ThankATeacher,

 #Thankyou Teacher, #MyFavouriteTeacher, #MyTeacher My Hero, #ThankATeacher2021

या # HASHTAG चा वापर करावा.

• तसेच Social Media समाज माध्यमांवर पोस्ट करत असताना खालीलप्रमाणे टॅग करून अपलोड करण्यात यावेत,

 १) फेसबुक- @thxteacher

२) ट्विटर वर @thxteacher

३) इंस्टाग्राम वर @thankuteacher

• विद्यार्थ्याच्या पोस्टची जबाबदारी पूर्णपणे स्पर्धकाची असेल याची नोंद घ्यावी.

शिक्षक / पालक यांचेसाठी सूचना

• पाल्यास आवश्यक मार्गदर्शन करावे.

• समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत असताना सर्व बाबींची तापसणी करूनच पोस्ट करावी.

• पोस्ट Public असेल याची काळजी घ्यावी.

एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे / पाल्यांचे साहित्य एकाच पोस्ट मध्ये अपलोड केल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.

विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे फोटो / व्हिडीओ हे सुस्पष्ट व वाचनीय असावेत याची दक्षता घ्यावी.

• विद्यार्थ्याच्या पाल्याच्या सादरीकरणामध्ये कोणताही चुकीचा आशय / आक्षेपार्य विधान केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

विद्यार्थ्याच्या पाल्याच्या पोस्टची जबाबदारी पूर्णपणे सदरच्या विद्यार्थ्याची/ पाल्याची असणार आहे,

याची नोंद घ्यावी.

मार्गदर्शन व्हिडीओ आवश्यक पहा

उक्तप्रमाणे आवश्यक विद्यार्थी व पालकांसाठीच्या सुचनांचे पालन करावे व या अभियानांतर्गत जास्तीत व जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवावा. तसेच सदरच्या अभियानांतर्गत आपल्या अधिनस्त पर्यवेक्षीय यंत्रणेची खालीलप्रमाणे भूमिका व जबाबदारी असणार आहे,

शिक्षणाधिकारी यांची भूमिका व जबाबदारी

शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक ) यांनी आपल्या अधिनस्त सर्व गटशिक्षणाधिकार क्षेत्रीय यंत्रांणा यांची सदरच्या अभियानाबाबतच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सुचानांसाठी बैठकीचे / ई बैठकांचे आयोजन करणे.

• जिल्हास्तरावरून आवश्यक त्या सुचना निर्गमित करणे.

वेळोवेळी आढावा बैठकीचे/ ई-बैठकांचे आयोजन करणे.

• जिल्ह्यातील सर्व गटांमध्ये सदरच्या कार्यक्रमास वेवेगळ्या माध्यमांद्वारे योग्य ती प्रसिद्धी देणे.

• जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी प्रयत्नशील राहणे.

जिल्हास्तरावर ऑनलाईन प्रणालीसाठी समन्वयकाची नेमणूक करणे.

गटशिक्षणाधिकारी यांची भूमिका व जबाबदारी

आपल्या गटामधील सर्व विस्तार अधिकारी (शिक्षण) / केंद्रप्रमुख / विषय साधन व्यक्ती यांच्या बैठकीचे / ई-बैठकांचे आयोजन करणे.

आवश्यक त्या सर्व सुचना सर्व शाळापर्यंत पोहचतील या प्रकारे नियोजन करणे. आपल्या गटामध्ये कार्यक्रमास योग्य ती प्रसिद्धी देणे.

वेळोवेळी केंद्र प्रमुखांच्या बैठका / ई बैठका घेऊन आढावा घेऊन अंमलबजावणी

आवश्यक मार्गदर्शनासाठी जिल्हास्तरावर अथवा राज्यस्तरावर समन्वय राखणे.

केंद्रप्रमुख यांची भूमिका व जबाबदारी

आपल्या कार्यक्षेत्रामधील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा सदरच्या अभियानामध्ये सहभागी होतील या दृष्टीने कार्यवाही करणे.

• जास्तीजास्त विद्यार्थी कार्यक्रमामध्ये आपला सक्रीय सहभाग नोंदवतील याप्रमाणे कार्यवाही करावी.

सदर कार्यक्रमांचे आयोजन करत असताना कोविड- १९ च्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या वेळोवेळी सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

वरीलप्रमाणे सर्व सूचना, भूमिका व जबाबदारी आपल्या अधिनस्त सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेस निदर्शनास आणून शिक्षक कार्य गौरव सप्ताह अभियानामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात यावे. 

अधिक माहितीसाठी व समन्वयासाठी श्री. योगेश सोनवणे, उपविभागप्रमुख, आय.टी. विभाग यांना ९१४५८२५१४४ व श्री. अभिनव भोसले, विषय सहायक, ८२०८८७९१५९ यांना संपर्क करावा.

यामधील सर्वोत्तम असलेल्या कार्यक्रमापैकी “राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद" महाराष्ट्र (SCERT) ने जिल्हानिहाय व गटनिहाय तीन सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करावी. कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर सदर विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात यावा.


सदर कार्यक्रमांचे आयोजन करत असताना कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

शासन परिपत्रक

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad