MDM Nutritious Slices For Student

 MDM न्युट्रीटिव्ह स्लाईस बाबत

 शालेय पोषण आहार

शालेय पोषण आहार योजने अंतर्गत न्युट्रीटिव्ह स्लाईस (बिस्किटे)* शाळेपर्यंत पोहचत आहेत.

या संदर्भात याचा वाटप कसा करायचा अशी विचारणा काही शिक्षकांकडून होत आहे.

      👉🏼त्याबाबतची माहीती पुढीलप्रमाणे- दिनांक 8 सप्टेंबर 2021 च्या महाराष्ट्र शासनाचे पत्रानुसार या योजने अंतर्गत महिन्याचे 24 दिवसांकरिता पुढीलप्रमाणे शाळांना साठा वाटप सुरू झाला आहे. 

  ♻️ इयत्ता 1 ते 5 करीता ♻️

🧇 तांदूळ-1

🧇 बाजरी-1

🧇 ज्वारी -2

🧇 नाचणी -1

🧇सोयाबीन-1

असे एकूण 6 पॅकेट प्रती विद्यार्थी मिळत आहेत.

 ♻️ इयत्ता 6ते 8 करीता ♻️

🧇तांदूळ-1

🧇बाजरी-2

🧇ज्वारी -2

🧇नाचणी -2

🧇सोयाबीन-2

असे एकूण 9 पॅकेट प्रती विद्यार्थी मिळत आहेत.

    💠 वरील प्रमाणे साठा प्राप्त झाल्यानंतर एकाच वेळेस टप्प्या टप्प्याने विद्यार्थी किवा पालकांना बोलावून इयत्ता 1ते 5 च्या विद्यार्थ्याला प्रत्येकी 6 पॅकेट तर इयत्ता 6 ते 8 चे विद्यार्थ्याला प्रत्येकी 9 पॅकेट वाटप करावयाचे आहे.

 👉🏼 प्रत्येक पॅकेट 120 ग्रॅम वजनाचे असून त्यात 16 स्लाईस (बिस्किटे) आहेत.

 🚸 1ते 5 च्या विद्यार्थ्याने आठवड्यातून पाच दिवस दररोज 4 बिस्किटे खावयाची आहेत तर.

🚸 6 ते 8 च्या विद्यार्थ्याने आठवड्यातून पाच दिवस दररोज  6 बिस्किटे खावयाची आहेत.अशा सुचना विद्यार्थी/पालकांना आपण द्यावयाच्या आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad