MDM Cooks And Helpers Work Chart

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाजाबाबत

शालेय पोषण आहार योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. योजनेअंतर्गत इ. ०१ ली ते ०८ वी मधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात येत असतो. 
अन्न शिजवून विद्यार्थ्यांना वाटप करणे व त्याअनुषंगाने इतर कामकाज करणे करीता शाळास्तरावर स्वयंपाकी तथा मदतनीसांची शाळा व्यवस्थापन समितीमार्फत नियुक्ती करण्यात येते. तथापि स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे विविध संघटनांकडून शाळा प्रशासनाकडून इतर कामे (उदा. शाळा उघडणे व बंद करणे. स्वच्छतागृहांची सफाई, शालेय वर्ग खोल्यांची सफाई करणे इ.) त्यांचेकडून करुन घेण्यात येत असलेबाबत निवेदने प्राप्त होत आहेत.

Regarding the work of cooks and helpers
संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ९ मध्ये स्वयंपाकी तथा मदतनीसांच्या कामाचे स्वरुप विशद करण्यात आलेले आहे.

अ. अन्न शिजविण्याचे काम करणे.

ब. तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे

क. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे व जेवणाच्या जागेवर करणे

ड. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर साफसफाई करणे (स्वयंपाकगृहासह ) तसेच सांडलेल्या अन्नाची योग्य विल्हेवाट लावणे.

इ. भांड्यांची साफसफाई करणे व जेवल्यानंतर ताटांची स्वच्छता करणे.

ई. पिण्याचे पाणी भरणे व जेवताना विद्यार्थ्यांना पाणी पुरविणे.

उ. शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे.

ऊ. अन्न शिजविणा-या यंत्रणेच्या आहारविषयक नोंदी ठेवणे.

वरील प्रमाणे उल्लेखित केलेल्या कामव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरुपाची कामे स्वयंपाकी तथा मदतनीस यांचेकडून करुन घेण्यात येऊ नयेत, याबाबत आपल्या अधिनस्त योजनेस पात्र असणा-या सर्व शाळांना योग्य ते निर्देश निर्गमित करण्यात यावेत व भविष्यात अशा स्वरुपाच्या तक्रारी उद्भवणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad