Ads Area

FLN Adhyayan Abhyas Survey For All School

FLN अध्ययन अभ्यास सर्वेक्षण 

सर्व शाळांना सक्तीचे सविस्तर वाचा

निपुण भारत अभियान अंतर्गत
FLN अध्ययन अभ्यास सर्वेक्षण राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या राज्य बोर्डाच्या सर्व शाळांनी करणे आवश्यक आहे. 
तसचे अध्ययन अभ्यास सर्वेक्षण निकाल Student portal वर भरणे आहे.

 त्यामुळे महाराष्ट्रातील राज्य बोर्डाच्या प्रत्येक वर्ग २ री ते ५ वीच्या वर्गाने, शाळेने या सर्वेक्षणात सहभाग नोंदवणे गरजेच आहे.

यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नपत्रिका, शिक्षक मार्गदर्शिका, प्रशिक्षण इत्यादी सर्व शिक्षांकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे

आपल्या वर्गाचे शाळेचे अध्ययन अभ्यास सर्वेक्षण २०२२ - २३ आपल्याला का करणे गरजेचे आहे? 
हे आपल्याला खालील मुद्द्यावरून स्पष्ट होईल.

या साठी करायचे आपल्या वर्गाचे,शाळेचे अध्ययन अभ्यास सर्वेक्षण 

अध्ययन अभ्यास सर्वेक्षण महत्त्वाचे

१. या सर्वेक्षणातून आपल्याला आपल्या वर्गातील किती विद्यार्थ्यांना मागील वर्गाच्या अध्ययन निष्पत्ती संपादित आहे हे समजण्यास मदत होईल.

२. या सर्वेक्षणातूनशासनाच्या अत्यंत महत्त्वाकांशी योजनेला आपण मदत करणार आहोत.

३.या सर्वेक्षणातून कोणता वर्ग मागे, कोणता वर्ग पुढे, कोणती शाळा मागे, कोणती शाळा पुढे या बाबी घडणार नाहीत.

४. आपल्या छोट्याशा कामामधून शासनाला गुणवत्तेच्या दृष्टीने धोरण ठरवण्यासाठी आपण मदत करणार आहोत.

५.अत्यंत प्रामाणिकपणे आणि वस्तुनिष्ठपणे आपण हे सर्वेक्षण करूया.

६. सर्वेक्षण करतांना आपल्याला कोणतीही अडचण निर्माण झाल्यास आपले केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट साधन केंद्रातील विषय साधनव्यक्ती, विशेषतज्ञ, विषय शिक्षक, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी DIET मधील अधिकारी सर्व पर्यवेक्षीय यंत्रणा मदतीसाठी आहे.

७.या सर्वेक्षणामधून कोणत्याही वर्गाला शाळेला सूट मिळणार नाही. हे राज्य बोर्डाच्या प्रत्येक शाळेला करणे अत्यावश्यक आहे.

८. सर्वेक्षणानंतर सर्व नोंदी व्यवस्थित ठेवाव्यात.

९. Student Portal Maharashtra वर सर्वेक्षणाचा निकाल भरण्यासाठी आपल्या लॉगिन वर टॅब उपलब्ध करून दिली जाणार आहे.

निपुण भारत : अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद प्रपत्रामध्ये विद्यार्थीनिहाय एकत्रित माहिती शाळा मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनी इयत्तानिहाय व विषयनिहाय संकलित स्वरुपात शाळास्तरावर ठेवावी.
 ही माहिती सरळ पोर्टलवर भरणेबाबत यथावकाश सूचना देण्यात येतील.

१०. स्टुडन्ट पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या टॅब वर सर्व वर्गशिक्षक, विषय शिक्षक, मुख्याध्यापक यांना सदर निकाल त्यावर भरणे ही त्यांची जबाबदारी असणार आहे.

११. आपण भरलेल्या माहितीवरून या निकालाच्या आधारावर शासन, शिक्षण विभागासाठी पुढील धोरण निश्चित करणार आहे.

 या सदर  सर्व बाबीवरून आपल्या हे लक्षात येते की,  लक्षात येते की, अध्ययन अभ्यास सर्वेक्षण २०२२ - २३ किती महत्त्वाचे आहे. या सर्वेक्षणाचा शिक्षण विभागामध्ये किती दूरगामी, सकारात्मक परिणाम होणार आहे.
त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकारी तर आपल्या मदतीला आहेच, याशिवाय मी एक शिक्षक या नात्याने हे काम अतिशय चोखपणे करणार आहे.

1प्रशिक्षणDownload
2शिक्षक सूचनाDownload
3अभ्यास सर्वेक्षण चाचणीDownload

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad