Intra District Teacher Transfer Eligible Round

जिल्हाअंतर्गत बदलीपात्र शिक्षकांनी

बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरावे ?

सविस्तर माहिती

Eligible - Round 1 ) 

नवीन वेळापत्रक डाऊनलोड

बदली पात्र शिक्षक महत्त्वाचे मुद्दे

      दिनांक 21 जानेवारी 2023

दिनांक 21 जानेवारी 2023 ते 26 जानेवारी 2023 दरम्यान बदली पात्र शिक्षकांना पसंतीक्रम भरण्याची संधी उपलब्ध होईल

बदली पात्र शिक्षकांच्या बदली टप्प्यामध्ये एकल बदली पात्र शिक्षक तसेच एक युनिट मधील बदली पात्र शिक्षक असोत त्यांच्या बदल्या त्यांच्या जिल्हा सेवाजेष्ठतेनुसार होतील

बदली पात्र शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या संभाव्य रिक्त जागा व रिक्त जागा पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्यास दिसणार आहेत.

बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक 21 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान आपला शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल.

दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करुन काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा Withdraw करु शकता.मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.

बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास कोणत्याही यादीमध्ये शाळांची शोधाशोध करण्याची गरज नाही.बदली पात्र शिक्षकांच्या पोर्टलवर दिसणाऱ्या सर्व शाळा ह्या बदली पात्र शिक्षकांकरिता उपलब्ध केलेल्या आहेत रिक्त पदांच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते समानीकरणातंर्गत अथवा अन्य कारणांनी आपल्या पोर्टलवरून वगळण्यात आले आहेत असे समजावे

बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरिता चार दिवस दिलेल्या आहेत त्याकरिता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये

या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदली पात्र शिक्षक असोत अशा शिक्षकांनी बदली घेतांना आपणास पोर्टलवर आपली सेवाजेष्ठता आपण दिलेल्या प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यासकरून बदलीसाठी प्राधान्यक्रम देतांना निर्णय घ्यावा कारण बदली पात्र शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या संभाव्य रिक्त शाळा व जिल्ह्यातील रिक्त शाळा प्राधान्यक्रमात द्यावयाचा आहे (अशावेळी रिक्त शाळा या सर्वसाधारण क्षेत्राबरोबरच अवघड क्षेत्रात जास्त प्रमाणात असू शकतात.

बदली पात्र शिक्षकांनी जर पसंतीक्रम भरला नाही तर त्यांना त्याच टप्प्यात उपलब्ध असलेल्या जागांवर बदलीने नियुक्ती दिली जाईल

बदली पात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये बदली मागतांना सेवाजेष्ठ किंवा आपल्यापेक्षा सेवाकनिष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकतो

एक युनिट स्पष्टीकरण

1) दोघेही पती-पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी सेवाजेष्ठ बदली पात्र शिक्षक किंवा बदली पात्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणे होय

2) पती-पत्नी( जिल्हा परिषद शिक्षक) दोघांपैकी एक शिक्षक बदली पात्र व जोडीदार बदली पात्र नसेल किंवा दोघेही शिक्षक बदली पात्र असतील तर त्यांना एक युनिट म्हणून बदली करण्याची संधी मिळेल

3) वरील एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक असून पती-पत्नीच्या कार्यरत शाळांमधील अंतर 30 किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे

4) एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदली पात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराचे संबंधित शाळेवर तीन वर्ष दिनांक 30 जून 2022 ला पुर्ण होणे अनिवार्य राहील*

5) जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवाजेष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिट करिता अर्ज भरावा लागेल

6) तसेच जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघांपैकी एक बदली पात्र शिक्षक असेल व त्यांचा जोडीदार बदली पात्र शिक्षक नसेल अशावेळी बदली पात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल यामध्ये आपल्या जोडीदाराची सेवा जेष्ठता अर्ज करण्याकरिता विचारात घेतली जाणार नाही

7) बदली पात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्यांच्या जोडीदारांनाही पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील*

8) एक युनिट म्हणून लाभ घेतांना सर्वप्रथम दोघांनाही दोन रिक्त जागा सिस्टीम देण्याचा प्रयत्न करेल व दोन रिक्त जागा असल्यास दोघांनाही बदली दिली जाईल परंतु दोन रिक्त जागा न मिळाल्यास त्यापैकी एक युनिट करिता अर्ज केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा प्रयत्न होईल व त्या शिक्षकास जागा मिळाल्यास त्या शिक्षकाची बदली केली जाईल

9) पती-पत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदली पात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीस पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्यांची बदली होणार नाही

10) एक युनिट करिता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र असतानाही त्याला शाळा मिळाली नसेल व अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले नसेल तर ते शिक्षक विस्थापित होतील

11) व जर अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले असेल तर त्यांना त्याच टप्प्यामध्ये उपलब्ध असलेल्या जागांवर बदली ने नियुक्ती दिली जाईल

12) पती-पत्नी दोघीही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिट मध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिट करिता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा जेष्ठतेनुसार बदली देण्यात येईल

होकार किंवा नकार याचे स्पष्टीकरण

बदली पात्र शिक्षकांना बदली करिता होकार किंवा नकार देण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे*

बदली पात्र शिक्षकांना बदली हवी असल्यास पहिला पर्याय निवडावा व बदली नको असल्यास दुसरा पर्याय निवडावा*

बदली पात्र शिक्षकांनी बदलीस नकार दिला असल्यास

1) बदली पात्र शिक्षकांनी पर्याय क्रमांक दोन मला बदली नको असून प्रशासकीय कारणास्तव माझी बदली होत असल्यास माझ्या खालील प्राधान्यक्रमाचा विचार करण्यात यावा हे निवडले असल्यास अशा शिक्षकांना त्यांची शाळा इतर शिक्षकांनी मागितली नसल्यास किंवा इतर शिक्षकांनी आपल्या पसंतीक्रमात दिलेली असतांना सुद्धा सिस्टीम ती शाळा त्यांच्या पसंती क्रमानुसार न देता इतर पर्यायी शाळा देण्याचा प्रयत्न करेन अशावेळी बदली टप्प्याच्या शेवटपर्यंत ती शाळा इतर शिक्षकांना बदलीने न दिल्यास सदर शिक्षकांची बदली होणार नाही

2) परंतु इतर शिक्षकांच्या पसंती क्रमातील त्या शिक्षकाची शाळा सोडून इतर शाळा उपलब्ध नसल्यास किंवा देणे शक्य होत नसल्यास अशावेळी पर्यायाने सदर शिक्षकाची शाळा बदलीने द्यावी लागेल अशा स्थितीमध्ये सदर शिक्षकांनी दिलेला पसंती क्रमातील शाळा इतर शिक्षकांनी घेतलेल्या असतील अशावेळी सदर शिक्षक विस्थापित होऊ शकतो

3) बदली पात्र शिक्षकांनी जर दुसरा पर्याय मला बदली नको असा निवडल्यास त्यांची बदली देतांना सेवाजेष्ठता विचारात घेतली जाणार नाही व अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले असल्यास त्यांना त्यांच्या प्राधान्य क्रमाने शाळा न मिळाल्यास त्याच टप्प्यामध्ये त्यांना उपलब्ध जागांवर बदली देण्यात येईल

4) ज्या बदली पात्र शिक्षकांची शाळा संवर्ग एक, संवर्ग दोन किंवा बदली अधिकार पात्र शिक्षकांनी बदलीने घेतलेली आहे अशा शिक्षकांनी पर्याय क्रमांक दोन निवडू नये

5) तसेच बदली पात्र सेवाकनिष्ठ शिक्षकांनी जे शिक्षक सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत अशा शिक्षकांनी सुद्धा पर्याय क्रमांक दोन मला बदली नको हा पर्याय निवडू नये

कारण सहाय्यक शिक्षक यांची संख्या खूप मोठी असल्यामुळे प्रत्येक शिक्षकांची शाळा कोणत्यातरी शिक्षकांच्या प्राधान्यक्रमामध्ये येऊ शकते व त्यामुळे सेवा कनिष्ठ शिक्षकांनी सेवाज्येष्ठ शिक्षकाची शाळा मागीतली असल्यास व त्यांना त्यांच्या पसंती क्रमाने ती मिळाल्यास सेवाज्येष्ठ शिक्षकांची बदली ही सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या सेवाज्येष्ठते नुसार होऊ शकते किंवा असे शिक्षक विस्थापित होऊ शकतात

6) बदलीपात्र शिक्षकांना जर या टप्प्यांमध्ये पसंतीक्रमानुसार शाळा मिळाली नाही व ते अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले नसेल तर ते विस्थापित होऊन त्यांना विस्थापित टप्प्यामध्ये पुन्हा 30 शाळा पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल

7) 2018 च्या बदली प्रक्रियेमध्ये शासन आदेशात बदली पात्र शिक्षकांच्या टप्प्यामध्ये बदली मागत असतांना सेवा कनिष्ठ शिक्षक हा सेवा जेष्ठ शिक्षकांची शाळा मागू शकत नसल्यामुळे बदलीला नकार दिलेल्या बहुतांशी शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत परंतु सद्यस्थितीत कोणताही शिक्षक कोणत्याही शिक्षकाची शाळा मागू शकत असल्यामुळे या बदली प्रक्रियेमध्ये नकार देऊन ही त्याच शाळेवर कायम राहणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी असेल

बदली पात्र शिक्षकांनी बदलीस होकार दिला असल्यास

1) बदली पात्र शिक्षकांनी बदली करिता मला बदली हवी आहे पर्याय क्रमांक एक निवडल्यास त्यांची बदली त्यांच्या दिलेल्या पसंतीक्रमाने त्यांचे जिल्हा सेवाज्येष्ठतेने होइल

2) बदली पात्र शिक्षकांना त्यांच्या पसंती क्रमानुसार शाळा न मिळाल्यास अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले नसेल तर ते विस्थापित होऊन विस्थापित टप्प्यामध्ये त्यांना पुन्हा तीस शाळांचा पसंती क्रम किंवा त्या टप्प्यामध्ये उपलब्ध शाळांचा पसंतीक्रम भरावा लागेल

परंतु अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले असेल तर त्यांना त्याच टप्प्यामध्ये उपलब्ध असलेल्या जागांवर बदली देऊन नियुक्ती दिली जाईल

3) ज्या बदली पात्र शिक्षकांची शाळा संवर्ग एक ,संवर्ग दोन किंवा बदली अधिकार पात्र शिक्षकांनी बदलीने घेतलेली असेल अशा शिक्षकांनी पर्याय क्रमांक एक (मला बदली हवी आहे ) निवडावाऔ

प्राधान्यक्रम भरताना बदली पात्र शिक्षकांनी खालील लिंकला क्लिक करावे

https://ott.mahardd.in/

वरील लिंकला क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP टाकावा त्याखालील कॅप्च्या टाकून पोर्टल लॉगिन करावे

संपूर्ण application form भरून सबमिट केल्यानंतर व मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर आपला application form आपल्या रजिस्टर ईमेलवर पीडीएफ स्वरूपात आपणास लगेच प्राप्त होईल

सदर ही पोस्ट विन्सिन कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व जीआर च्या आधारे तयार केलेली आहे या मताशी आपण सहमत असालच असं सांगता येणार नाही

अर्ज भरण्यासाठी लिंक 

खालील लिंक वर क्लिक करा

बदली पोर्टल व्हिडीओ

(संवर्ग 4 पसंतीक्रम)

बदली पात्र शिक्षकांनी (संवर्ग 4) शाळेचा पसंतीक्रम कसा भरावा?

फॉर्म भरून सबमिट कसा करावा?

एक युनिट अंतर्गत फॉर्म कसा भरावा? एक युनिट चे नियम काय?

विस्थापित कसे होऊ शकता

याबाबत बदली पोर्टल  Vinsys कडून नवीन आलेला सविस्तर मार्गदर्शक व्हिडिओ


अवघड क्षेत्रातील बदली पात्र शिक्षकांच्या बदली प्रक्रियेनंतर रिक्त जागा बदली पात्र शिक्षकांमधून पदस्थापित न झाल्यास ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्षाचे वर सेवा झालेले असल्यास अशा शिक्षकांना शाळेच्या कालावधीची अट राहणार नाही अशा शिक्षकांना वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा

या ठिकाणी अवघड क्षेत्रातील जेवढ्या जागा रिक्त असतील तेवढ्याच शिक्षकांना सेवाजेष्ठतेने व प्राधान्यक्रमाने अवघड क्षेत्रातील रिक्त जागांवर पदस्थापित केले जाईल

ज्या शिक्षकांना आपल्या सेवाजेष्ठतीने व पसंतीक्रमाने शाळा न मिळाल्यास त्यांना उर्वरित रिक्त जागांवर पदस्थापित

केले जाईल

बदलीस पात्र शिक्षक व्याख्या ( संवर्ग 4 )

बदली जिल्हांतर्गत बदली च्या नवीन धोरणामध्ये बदलीस पात्र शिक्षकाची नवीन व्याख्या केली आहे. ज्याला आपण संवर्ग ४ म्हणतो .

बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा दहा वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक. तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील पाच वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठते प्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रांमध्ये बदली करून पदे स्थापित करण्यात येईल.

( बदलीस पात्र शिक्षकांसाठी अवघड क्षेत्रासाठीचा वरील उल्लेख देखील खूप महत्वाचा आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad