NMMS Scholarship Exam Final Answer Key MSCE

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक

विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

परीक्षा (NMMS) २०२२-२३ 

अंतिम उत्तरसूची जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी इ. ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in/व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

NMMS शिष्यवृत्ती परीक्षा


उत्तरसूचीडाउनलोड
1.MAT  AnswerDownload
2.SAT  AnswerDownload
3.प्रश्नपत्रिकाDownload

सदर परीक्षेच्या MAT व SAT पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी / आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन

 दिनांक ०४/०१/२०२३ अखेरपर्यंत पाठविण्याबाबत दिनांक २८/१२/२०२२ रोजीच्या प्रसिध्दी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. 

विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन / आक्षेप स्विकारले जाणार नाहीत, तसेच सदर परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही याची मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

या अंतिम उत्तरसूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल

आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ४११००१

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad