Teacher TAIT Examination Time Table Announce

डीएड, बीएड उमेदवारांसाठी अखेर

मोठी घोषणा! शिक्षक अभियोग्यता

चाचणीसाठी वेळापत्रक जाहीर

 पाच वर्षापासून रखडलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता (TAIT Exam) चाचणीची प्रतीक्षा आता संपली आहे. 

सन 2017 नंतर आतापर्यंत 5 वर्षे उमेदवार प्रतिक्षेत असताना आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची अखेर घोषणा झाली आहे.

 MSCE Pune राज्य परीक्षा परिषदेकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 

 महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२२' या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे.

 त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT)- २०२२

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने "शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२२" चे आयोजन

ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ पासून करण्यात येणार आहे

राज्यातील तीन लाखाहून अधिक डीएड-बीएड धारक आणि 54 हजार पात्र शिक्षक या अभियोग्यता चाचणीसाठी प्रतिक्षेत असतांना आता परिषदेकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

दिनांक  22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या दरम्यान ऑनलाईन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 8 फेब्रुवारी आहे. 


वेळापत्रक

◆ ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी - 

दिनांक 31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023

◆ परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधी -

 दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रात्री 11. 59 वाजेपर्यंत.

◆ प्रवेशपत्र ऑनलाईन मिळण्याचा कालावधी- 

दिनांक 15 फेब्रुवारीपासून 2023 पासून.

◆ ऑनलाईन परीक्षेच्या तारखा -

 दिनांक 22 फेब्रुवारीपासून ते 3 मार्च 2023 पर्यंत.

(उमेदवार संख्येनुसार किंवा इतर कारणाने वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.) 

TAIT - 2022 अर्ज सादर करण्यासाठी खालील वेब लिंकवर क्लिक करा

https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/


परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in 

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

• अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता १० वी इयत्ता १२ वी, पदविका, पदवी इ. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे.

• सदर परीक्षेस व पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ शकतो. 

त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा.

• ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. 

मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.

शिक्षक पद व अभ्यासक्रम

उपलब्ध पदसंख्या राज्यातील शिक्षण सेवकांच्या / शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती, विषय, प्रवर्ग, माध्यम व बिंदू नामावली नुसार 'पवित्र' (PAVITRA-Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीव्दारे प्रसिध्द करण्यात येईल.

 परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रमः

३.१ परीक्षेचे माध्यम : 

परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असेल, भाषिक क्षमता (मराठी) व भाषिक क्षमता (इंग्रजी) यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न व्दिभाषिक असतील. त्यामुळे परीक्षार्थीनी इंग्रजी- मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे.

३.२ अभ्यासक्रम:

सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे दोन घटक राहतील.

अभियोग्यता 

शेकडा प्रमाण.  ६० %

एकूण गुण  १२०

एकूण गुण   १२०


बुध्दिमत्ता

शेकडा प्रमाण.  ४० %

एकूण गुण  ८०

एकूण गुण  ८०

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad