Shala Siddhi Primary School Evaluation Training

शाळासिद्धी अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांचे बाह्य मूल्यमापन करणेबाबत संपूर्ण मार्गदर्शन


शाळा सिद्धि बाह्य मूल्यमापन अपडेट

सर्वांना नमस्कार

आज आपण क्षेत्र क्रमांक एक

शाळेचे सामर्थ्य स्त्रोत

गाभा मानके 12

1)शालेय आवार

2) क्रीडांगणे उपकरणे व साहित्यासह मैदान

३) वर्ग खोल्या व इतर खोल्या ४)वीज व विद्युत उपकरणे ५)ग्रंथालय 

६)प्रयोगशाळा 

७)संगणक 

८)रॅम्प 

९)मध्यान भोजन स्वयंपाक खोली व भांडी

१०) पेयजल 

११)हात धुण्याची सुविधा १२)स्वच्छतागृह

याविषयी सविस्तर माहिती पाहूया. मित्रहो आपण बाह्य मूल्यमापनाला गेल्यानंतर सदर शाळेने भरलेली लेवल आपण तपासूया

या ठिकाणी

 लेवल एक १ गुण

 लेवल दोन २ गुण 

लेवल तीन-३गुण याप्रमाणे

 क्षेत्र क्रमांक एक यास ३६ गुण

पैकी किती गुण पडले ते हे पाहावे

या ठिकाणी सर्व लेवल ची माहिती न देता लेवल फक्त लेवल तीन ची माहिती सांगतो यावरून तुम्हाला लक्षात येईल


१) शालेय परिसर;

प्रार्थनेसाठी पुरेशी जागा विद्यार्थ्यांच्या प्रमाणात मोकळी जागा प्रवेशद्वार वॉल कंपाऊंड शालेय परिसरात बगीचा झाडे व परिसर स्वच्छ व  प्रसन्नआहे असे निदर्शनास आल्यास ती लेवल तीन समजावी म्हणजेच 

तीन गुण धरावे

शालेय परिसरात काय पहाल

१ )प्रवेशद्वार वॉल कंपाऊंड परसबाग वृक्षारोपण शालेय आवारात सुविचार शालेय बगीचा

हे सर्व स्वच्छ व टापटीप असावेत


२) क्रीडा उपकरणे व मैदान:

यात काय पहा ल

१) मैदानात आखलेली क्रीडांगणे, 

२) खेळाच्या साहित्याची यादी

३) खेळाचे प्रत्यक्ष साहित्य

४) क्रीडा स्पर्धा रजिस्टर

५) क्रीडा संबंधित सहशाले य उपक्रमांची यादी


गाभामानक 3 वर्ग खोल्या व इतर खोल्या

यामध्ये 1) शाळेतील वर्ग खोल्यांची संख्या विद्यार्थी बैठक व्यवस्था मुख्याध्यापक कक्ष स्टाफ रूम प्रयोगशाळा संगणक कक्ष ग्रंथालय कक्ष किचन शेड याची पाहणी करून शाळेशी संबंधित पटानुसार पुरेशी असेल तर लेवल तीन समजावे


गाभामानक 4  विद्युत उपकरणे

यामध्ये

शाळेत विज आहे का इन्व्हर्टर सर्व वर्ग खोल्या त पंखे ध्वनी व्यवस्था साऊंड सिस्टम विद्युत उपकरणांची वेळीच दुरुस्ती

विजेवर चालणाऱ्या उपकरणांची यादी

आपत्कालीन व्यवस्था  सर्व सुस्थितीत असेल तर लेवल तीन समजावे


5 ग्रंथालय

यामध्ये ग्रंथालय खोली ग्रंथालय देव रजिस्टर पुस्तकांची संख्या शब्दकोश मासिके वृत्तपत्रे संदर्भ साहित्य डिजिटल लायब्ररी बैठक व्यवस्था शाळेस अनुरूप असेल तर लेवल 3 समजावे


6 प्रयोगशाळा

प्रयोग कक्ष 

इयत्ता निहायप्रयोगांची यादी

प्रयोग साहित्य प्रथमोपचार पेटी साहित्य देव घेव रजिस्टर प्रयोगशाळेचे वेळापत्रक साहित्याची मांडणी कशी आहे विद्यार्थ्यांना पुरेशी संधी मिळते का या बाबी शाळेत अनुरूप असतील लेवल तीन समजावे


7 संगणक

यामध्ये उपलब्ध संगणक संख्या

संगणक कक्षाचे वेळापत्रक

वायफाय सुविधा उपकरणांची उपलब्धता शाळेची वेबसाईट शाळेचा ब्लॉग शाळेची पीपीटी

सर्व विद्यार्थ्यांना संगणक हाताळता येतो का? शाळेतील शिक्षक तंत्रज्ञान आहेत का शाळेचा ई-मेल आयडी अभ्यासक्रमात सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत का संगणक उपस्थितीत आहेत का

या सर्व बाबी व्यवस्थित असतील तर लेवल तीन समजावे


8 रॅम्प

शाळेत रॅम्प व्यवस्था आहे का

स्वच्छतागृहासाठी रॅम्प

नियोजित मापानुसार रॅम्प आहे का शाळेतील एकूण रॅम्प ची संख्या हे सर्व व्यवस्थित असेल तर लेवल तीन समजावे


9 मध्यान भोजन

किचन शेड उपलब्ध आहे का

पुरेशी भांडी धान्य ठेवण्याची व्यवस्था पोषण आहार शिजवण्याची व्यवस्था भांड्यांची स्वच्छता व देखभाल स्वयंपाक मदतीस यांचे करारनामा फिटनेस दाखला शा पो नमुना ठेवला जातो का  चव रजिस्टर हे सर्व व्यवस्थित असेल तर  लेवल तीन समजावे


10 पेयजल

पाणी साठवण्याची टाकी व क्षमता टाकी धुतलेली संख्या व तारीख  पाण्याचे स्त्रोत पाणी शुद्धीकरण प्रक्रिया तोट्यांची संख्या पाण्याची गुणवत्ता तपासणी अहवाल पाणी पुरेशी प्रमाण उपलब्ध आहे तर लेवल तीन समजावे 


11 हात धुण्याची सुविधा

हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे हात धुण्यासाठी कोणते साहित्य वापरले जाते ही प्रत्यक्ष पाहावे विद्यार्थ्यांना हात धुण्याचे ज्ञान आहे स्वच्छते विषयी राबवलेली उपक्रम हे सर्व असेल तर लेवल तीन समजावे समजा

12 स्वच्छतागृह

चालू स्थितीतील स्वच्छतागृहांची संख्या

स्वच्छतागृहातील सुविधा  पाण्याची सुविधा  चप्पल ब्रश फीनेल साबण रुमाल

मुला मुली साठी स्वतंत्र्य व्यवस्था हात धुण्यासाठी सुविधा स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाते

स्वच्छता विषयक उपक्रम स्वच्छतेचे संदेश स्वच्छतेचे नियम याची विद्यार्थ्याकडून माहिती घ्यावी या सर्व बाबी व्यवस्थित असतील तर लेवल तीन समजावे

   वरील क्षेत्र क्रमांक एक बारा गाभा मानके तपासून लेवल निश्चित करा

सदर क्षेत्रांचे पुरावे प्रत्यक्ष

 संदर्भ साहित्य 

व फोटो रूपात पाहावे

 व 36 पैकी किती गुण पडतात पहा

आपल्या बाह्य मूल्यमापनास आपणास हार्दिक शुभेच्छा

शाळा सिद्धी राज्य मार्गदर्शक


संदर्भ :- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे प्राप्त पत्र जा.क्र.मप्राशिप सशि/ शाळासिद्धी/काअ/२०२२-२३/३०६ दि. ०७/०२/२०२३

उपरोक्त सदर्भिय विषयानुसार समग्र शिक्षा अंतर्गत शाळासिद्धी उपक्रम अंतर्गत (२०२०-२१ या वर्षातील) स्वयं मूल्यमापन पूर्ण केलेल्या प्राथमिक स्तरावरील १०,००० व माध्यमिक स्तरावरील १८५१ शाळांचे बाह्य मूल्यमापन करणे प्रस्तावित आहे. 

सदर शाळांचे बाह्य मूल्यमापन करणेसाठी आपल्या स्तरावरून शाळा व निर्धारक निश्चित करावेत. निश्चित केलेल्या निर्धारकाना NIEPA, नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने

 दिनांक २४.०२.२०२३ रोजी ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करून शाळांच्या बाह्य मूल्यमापनासाठी प्रती शाळा रु. ४९०/- प्रमाणे आपणास PFMS प्रणालीद्वारे निधी वितरीत केला जाणार आहे. 

तरी सोबत जोडलेल्या माहिती पत्रकानुसार आपल्या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे बाह्य मूल्यमापन करून तसा अहवाल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, coordinationdept@maa.ac.in 

या ईमेल वर कळविण्यात यावा.

 सोबत : महितीपत्रक महाराष्ट्र, पुणे कार्यालयास

१. शाळांची निश्चिती कशी करावी ?

सन २०२० - २१ वर्षातील स्वयं मूल्यमापन झालेल्या वर दिलेल्या सारणीत संख्येएवढी शाळांची निवड करावी.

प्रत्येक केंद्रातील शाळा असावी. तसेच इयत्ता १ ली ते ५ वी, इयत्ता १ ली ते ८ वी इयत्ता १ ली ते १० वी इयत्ता ५ वी ते १० वी अशा शाळा घेण्यात याव्यात. ( इयत्ता १० वी १२ वी परीक्षा केंद्र असलेल्या शाळा निवडू नयेत.)


https://shaalasiddhi.nepa.ac.in/shaalasiddhi/Reports / DataStatus ReportFor PublicNew?

AcademicYearld=0

 या लिंकवर जाऊन आपल्या जिल्ह्यातील शाळांची Excel sheet डाउनलोड करू शकता. 

किंवा २०२० - २१ या वर्षातील स्वयं मूल्यमापन पूर्ण केलेल्या राज्यातील शाळांची Excel sheet पत्रासोबत देण्यात येत आहे. यातून आपल्या जिल्ह्यातील शाळा निवडू शकता.

२. निर्धारक निश्चिती कशी करावी ?

उदा: "अ "नावाच्या शाळेचे बाह्य मूल्यमापन करायचे आहे. 

निर्धारक "अ " शाळेतील नसावा. AL अ शाळा ज्या केंद्रात येते, त्या केंद्रातील निर्धारक नसावा. तसेच निर्धारक म्हणून काम करण्यास इछुक असलेल्या व्यक्तीस शाळा सिद्धी उपक्रमाची माहिती असावी. ( इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेच्या कामात व्यस्त असलेले मनुष्यबळ निवडू नये.)

३. निर्धारक किती नेमावेत ?

कमीत कमी २, जास्तीत जास्त ५,

शाळेतील विद्यार्थी संख्येचा विचार करून निर्धारक निश्चिती करावी.

४. निर्धारक कोण असावेत ?

जिल्हा प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील अधिकारी, विषय तज्ञ, विशेष तज्ञ, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक. (शाळा सिद्धी उपक्रमाची माहिती असावी)


५. निर्धारक Whatsapp Group प्रत्येक जिल्ह्याचा असेल

निर्धारक व शाळा यांची जोडी करताना विद्यार्थी संख्या विचारात घेऊन निर्धारक निश्चिती करावी.

 ६. निर्धारक प्रशिक्षण

प्रत्येक जिल्ह्याचा निर्धारक Whatsapp Group तयार झाल्यावर Zoom द्वारे प्रशिक्षण SCERT

प्रशिक्षण कालावधी

दिनांक 24 फेब्रुवारी 2023

वेळ - सकाळी 11 वाजता Live

महाराष्ट्र, पुणे आणि NIEPA. न्यू दिल्ली मार्फत आयोजन. 

प्रशिक्षण तारीख २४.०२.२०२३ रोजी उपस्थित राहावे असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad