Teaching And Non Teaching Staff Salary For Month Of March

0 श्री डि जे राठोड

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 

माहे मार्च महिन्याचे वेतन तात्काळ 

अदा करण्याबाबत आदेश जाहीर 

होणार! शासन परिपत्रक

 
Teaching and non-teaching staff
 Salary for the month of March

State Employees -  खुशखबर !शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 
माहे मार्च महिन्याचे वेतन लवकर 
होणार सविस्तर वाचा

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतना संदर्भात. माहितीनुसार, शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनासाठी अनुदान वितरण करण्यात आले आहे

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद सणामुळे मार्च महिन्याचे वेतन अदा करणेबाबत संदर्भ:- शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांचे पत्र दिनांक २७.०३.२०२३

विषयांकीत प्रकरणी नमूद करण्यात येते की, वित्त विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा रमजान ईद सणामुळे माहे एप्रिल महिन्याचे वेतन ईद सणापूर्वी अदा करणेबाबत अद्यापि परिपत्रक निर्गमित केलेले नाही. 


तसेच सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षासाठी मंजूर अर्थसंकल्पिय निधीपैकी वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर उपलब्ध झालेले अनुदान / निधी नियंत्रक अधिकारी यांचे अधिनस्त ठेवण्यास शासन निर्णय दिनांक १०.०४.२०२३ अन्वये मान्यता दिलेली आहे. त्यानुसार शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन तात्काळ अदा करण्याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना द्याव्यात, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website