केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता
कार्यक्रम २०२२- २०२७
सर्वेक्षणाला सुरुवात व मार्गदर्शन
सूचना ! प्रपत्र डाऊनलोड करा
प्रत्येक जिल्हयाचे दोन्ही वर्षांचे उद्दिष्ट राज्यस्तरावरून निश्चित करून देण्यात आलेले आहे. सदरचे उद्दीष्ट सन २०११ जनगणनेतील निरक्षर संख्येनुसार ठरविण्यात आलेले आहे
सद्यस्थितीत निरक्षरांची नावनिहाय माहिती उपलब्ध नसल्याने व २०११ च्या जनगणनेस १२ वर्षांहून अधिक कालावधी उलटला असल्याने सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी ऑफलाईन पध्दतीने
निरक्षरांचे सर्वेक्षण करणे क्रमप्राप्त आहे. केंद्रशासनाच्या अॅपमध्ये सर्वेक्षणाची उद्दीष्टानुसार ऑनलाईन माहिती भरण्यापूर्वी यासाठी
पुढील प्रमाणे कालबध्द कार्यक्रम व मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत
१) सर्वेक्षणाचा उद्देश -
अ) निरक्षरांची नावनिहाय, लिंगनिहाय, प्रवर्गनिहाय अदयावत माहिती प्राप्त करून घेणे.
ब) एकूण निरक्षरांची संख्या निश्चित करणे.
क) दरवर्षी साध्य करावयाच्या उद्दीष्टानुसार निरक्षरांचे वर्गीकरण करणे (दरवर्षीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी लागणारी माहिती व संख्या उपलब्ध करणे)
ड) या सर्वेक्षणात निरक्षर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून देणे हा
सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.
२) ऑफलाईन सर्वेक्षणाचा कालावधी :
निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२३ (१४ दिवस) या कालावधीत पूर्ण करण्यात यावे. या कालावधीतच शाळाबाहय विद्यार्थी शोध मोहिम राज्यभर राबविण्यात येत आहे. दोन्ही सर्वेक्षण एकाच वेळी करणे सोईचे व्हावे म्हणून हा कालावधी निश्चित करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण शाळा भरणेपूर्वी व शाळा सुटल्यानंतर
करण्यात यावे. शालेय कामकाजाच्या वेळात सर्वेक्षण करू नये.
३) सर्वेक्षण कोणाचे करावे.
वय वर्ष १५ व त्यापुढील सर्व निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करावयाचे आहे.
४) प्रपत्र प्रकार व प्रपत्र भरणेबाबत मार्गदर्शक सूचना :-
प्रपत्र क्रमांक १ ते ३ सर्वेक्षकांनी भरावयाचे आहे. प्रपत्र क्रमांक ४ ते ६ मुख्याध्यापकांनी तयार करावयाचे आहे. प्रपत्र क्रमांक ७ ते ९ केंद्रप्रमुखांनी भरावयाचे आहे. प्रपत्र क्रमांक १० व १९ गट शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी म.न.पा व अधिव्याख्याता, डायट यांनी संयुक्तपणे भरावयाचे आहे. प्रपत्र क्र.१२ व १३ ही प्रपत्रे शिक्षणाधिकारी (योजना) व प्राचार्य डायट यांनी संयुक्तपणे भरावे.
निरक्षरांची माहिती भरताना ती इंग्रजी कॅपिटल लेटर्स (capital letters) मध्ये भरावी. व आवश्यक तेथे इंग्रजी अंकाचाच उपयोग करावा. सर्व प्रपत्रांसाठी A-4 आकाराचा कागद वापरावा.
१) निरक्षरांची सांख्यिकीय माहिती सर्वेक्षकस्तर प्रपत्र १ (सर्वेक्षकांनी भरावयाचे प्रपत्र) हे प्रपत्र सर्वेक्षकाने प्रत्यक्ष सर्व करताना भरावयाचे आहे. सर्वेक्षकाने त्यास निश्चित करून दिलेल्या क्षेत्रातील सर्व कुटुंबांची माहिती प्रपत्र
-१ मध्ये अनिवार्य आहे.
२) सर्वेक्षकस्तर प्रपत्र २ निरक्षरांची माहिती (सर्वेक्षकांनी भरावयाचे प्रपत्र) हे प्रपत्र सर्वेक्षकाने प्रत्यक्ष सर्व्हे करताना
कुटुंबांत निरक्षर व्यक्ती असल्यासच भरावयाचे आहे.
३) निरक्षरांची प्रवर्गनिहाय, लिंगनिहाय सांख्यिकीय माहिती सर्वेक्षकस्तर प्रपत्र ३ (सर्वेक्षकांनी भरावयाचे प्रपत्र ) हे
प्रपत्र सर्वेक्षकाने प्रत्यक्ष सव्हें संपल्यानंतर तयार करावे. शाळास्तर सांख्यिकीय माहिती प्रपत्र क्र. ४ (मुख्याध्यापकांसाठी) हे प्रपत्र तयार करताना मुख्याध्यापकांनी प्रपत्र क्रमांक-१ मधील माहितीचा उपयोग करावा. शाळेने नेमलेल्या सर्व सर्वेक्षकांच्या प्रपत्र- १ मधील सांख्यिकी माहिती सर्वेक्षकनिहाय लिहावी
५) निरक्षरांची यादी शाळास्तर प्रपत्र क्र. ५ ( मुख्याध्यापकांसाठी) या प्रपत्रामध्ये शाळेच्या क्षेत्रातील एकूण निरक्षर - व्यक्तीची यादी तयार होईल.
हे प्रपत्र तयार करताना मुख्याध्यापकांनी प्रपत्र क्र. २ मधील माहितीचा उपयोग करावा.
६) निरक्षरांची प्रवर्गनिहाय, लिंगनिहाय सांख्यिकीय माहिती शाळास्तर प्रपत्र ६ (मुख्याध्यापकांनी भरावयाचे प्रपत्र) हे प्रपत्र मुख्याध्यापकांनी प्रत्यक्ष सर्व्हे संपल्यानंतर तयार करावे. हे प्रपत्र तयार करण्यासाठी प्रपत्र क्र. ३ चा उपयोग करावा.
(७) निरक्षरांची गावनिहाय सांख्यिकीय संकलित माहिती केंद्रस्तर प्रपत्र क्र. ७ हे प्रपन्न केंद्रप्रमुख यांनी तयार करावयाचे आहे.
केंद्रातील प्रत्येक महसूल गावासाठी स्वतंत्र तक्ता तयार करणे आवश्यक राहील.
(८) गावनिहाय निरक्षरांची संकलित यादी- केंद्रस्तर प्रपत्र क्र.८ (केंद्रप्रमुखांनी तयार करावयाचे प्रपत्र)- केंद्रप्रमुख ज्यांनी हे प्रपत्र तयार करताना मुख्याध्यापक यांच्याकडील निरक्षर यादी प्रपत्र क्र.५ चा वापर करावा. प्रत्येक गावातील सर्व निरक्षरांची यादी या नमुन्यात तयार करावी.
९) निरक्षरांची प्रवर्गनिहाय, लिंगनिहाय सांख्यिकीय माहिती केंद्रस्तर गावनिहाय प्रपत्र ९ (केंद्रप्रमुखांनी तयार करावयाचे प्रपत्र )- हे प्रपत्र केंद्रप्रमुखांनी प्रत्यक्ष सर्व्हे संपल्यानंतर तयार करावे. हे प्रपत्र तयार करण्यासाठी प्रपत्र क्र. ६ चा उपयोग करावा.
१०) निरक्षरांची सांख्यिकीय माहिती तालुका / म.न.पा स्तर प्रपत्र क्र. १० ( गट शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी व अधिव्याख्याता, डायट यांचे करिता) हे प्रपन्न गट शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, अधिव्याख्याता, डायट यांनी तयार करावयाचे आहे. गट शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, म.न.पा व अधिव्याख्याता, डायट यांनी गावनिहाय / वार्डनिहाय निरक्षरांची सांख्यिकीय माहिती प्रपत्र क्र. ७ केंद्रप्रमुखांकडून प्राप्त करून एकत्रीकरण करावे. सदरहू माहिती शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाला सादर करावी.
११) निरक्षरांची प्रवर्गनिहाय, लिंगनिहाय सांख्यिकीय माहिती तालुकास्तर गावनिहाय प्रपत्र क्र.११- (गट शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, अधिव्याख्याता, डायट यांचे करिता)- हे प्रपत्र गट शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी व अधिव्याख्याता, डायट प्रत्यक्ष सव्र्व्हे संपल्यानंतर तयार करावे. हे प्रपत्र तयार करण्यासाठी प्रपत्र क्र. - ९ चा उपयोग करावा.
१२) निरक्षरांची सांख्यिकीय माहिती जिल्हास्तर प्रपत्र क्र. १२ ( शिक्षणाधिकारी योजना व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या करिता)- शिक्षणाधिकारी (योजना) व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी तालुक्यातील निरक्षरांची सांख्यिकीय माहीती गट शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, म.न.पा यांच्या कडून प्रपत्र क्र. १० प्राप्त नुसार एकत्रिकरण करून तयार करावी.
१३) निरक्षरांची प्रवर्गनिहाय, लिंगनिहाय सांख्यिकीय माहिती जिल्हास्तर तालुकानिहाय प्रपत्र क्र.१३- (शिक्षणाधिकारी योजना व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी तयार करावयाचे प्रपत्र ) - हे प्रपत्र शिक्षणाधिकारी (योजना) व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी प्रत्यक्ष सर्व्हे संपल्यानंतर तयार करावे. हे प्रपत्र तयार करण्यासाठी प्रपत्र क्र. ११ चा उपयोग करावा.
५) सर्वेक्षण कोठे करावे.
या सर्वेक्षणात दिनांक १७.०८.२०२३ ते ३१.०८.२०२३ या कालावधीमध्ये निरक्षर व्यक्तींचा शोध घेताना ग्रामपंचायत /नपा/मनपा क्षेत्रात प्रत्येक कुटुंबात घरोघरी जाऊन प्रत्यक्ष माहिती घेणे क्रमप्राप्त आहे. सदरचे सर्वेक्षण वस्ती, वाडी, गाव, सर्व खेडी, तांडे, पांडे, शेतमळा, वार्ड, या सर्व ठिकाणांचा समावेश करण्यात यावा. एकही निरक्षर व्यक्ती सर्वेक्षणातून वगळली जाणार नाही, या दृष्टीने नियोजन करण्याची दक्षता प्रत्येक टप्यावरील प्रशासनाकडून घेण्यात यावी.
६) सर्वेक्षणाची कार्यपद्धती
१) नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत शाळा हे एकक (युनिट) आहे. त्यामुळे ऑफलाईन सर्वेक्षणासाठी शाळांनी क्षेत्र निश्चित करून सर्वेक्षक-शिक्षक यांची नियुक्ती करावी. म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक (सदस्य सचिव) व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचे संयुक्त स्वाक्षरीने सर्वेक्षण करणेबाबत सर्वेक्षक शिक्षक याना लेखी स्वरुपाचे आदेश देण्यात यावेत.
२) यापूर्वी शाळास्तरावर शाळानिहाय कुटूंब सर्वेक्षण, गावपंजिका, शाळाबाहय विदयार्थी शोधमोहिम राबविण्यात आलेली आहे.
सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नगरपालिका शाळा, महानगरपालिका शाळा यांचे प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक यांचे सहकार्य घेण्यात आलेले आहे. पंचायत समिती स्तरावर गटसाधन केंद्रात कार्यरत असलेले विषयतज्ञ व विशेष शिक्षक यांचेही सहकार्य घेण्यात आलेले आहे.
३) सर्व माध्यमांचे व्यवस्थापनाचे मुख्याध्यापक, यांना सूचीत करण्यात येते की, शाळानिहाय कुटूंब सर्वेक्षण, गावपंजिका, शाळाबाहय विद्यार्थी शोध मोहिम करतांना ज्या शिक्षकांची मदत घेण्यात आली होती. अशा शिक्षकांना निरक्षर सर्वेक्षण मोहिमेसाठी सर्वेक्षक शिक्षक म्हणून आदेशित करण्यात यावे. पूर्वीचे सर्वेक्षण करतांना निर्धारित केलेले क्षेत्र अशा सर्वेक्षक शिक्षकांना निश्चित करून द्यावे. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार सर्वेक्षक शिक्षक यांनी सर्वेक्षण केल्यानंतर प्राप्त माहिती विहित प्रपत्र मध्ये भरून मुख्याध्यापक यांना सादर करावे.
४) प्रथमतः शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यामिक / योजना) यांनी संयुक्त स्वाक्षरीने निरक्षर शोध, सर्वेक्षण मोहिम बाबत जिल्हयातील सर्व गट शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, नगरपालिका याना पत्राद्वारे कळवावे.
सर्वेक्षण तक्ता सूचना
१) हा तक्ता सर्वेक्षकाने प्रत्यक्ष सर्व्हे करताना भरावयाचा आहे.
सर्वेक्षकाने त्यास निश्चित करून दिलेल्या क्षेत्रातील सर्व कुटुंबांची माहिती प्रपत्र १ मध्ये भरणे अनिवार्य आहे. (कुटुंबत निरक्षर व्यक्ती असो अथवा नसो)
२) स्तंभ क्र.९- साठी कोड-
जात प्रवर्ग -
खुला-१,
अल्पसंख्याक (मुस्लिम,ख्रिश्चन,पारशी,जैन,बोैध्द,शीख)-२,
इ.मा.व.-३,
अ.जाती-४, अ.जमाती-५,
३) स्तंभ क्र. २९- मध्ये नोंद झालेस स्वतंत्रपणे निरक्षर व्यक्तीची माहिती प्रपत्र -२ मध्ये भरावी.
४) सदरचे प्रपत्र एकूण ५ कटुबांसाठी वापरता येईल. सर्वेक्षकास शाळेने निश्चित करून दिलेल्या क्षेत्रात असलेल्या कुृटुंब संख्येनुसार प्रपत्रे उपलब्ध करून द्यावी
५) स्तंभ क्रमांक १३ मध्ये कटुंबातील सर्व सदस्य म्हणजे नवजात बालक ते वयोवृध्द व्यक्तींची बेरीज येईल तर स्तंभ क्रमांक १७ मध्ये त्या कटुंबातील १५ वर्षापुढील सर्व व्यक्तींची बेरीज येईल.
६) निरक्षरांची माहिती भरताना ती इंग्रजी कॅपिटल लेटर्स (capital letters) मध्ये भरावी. व आवश्यक तेथे इंग्रजी अंकाचाच उपयोग करावा.
शाळा स्तर सर्वेक्षण प्रपत्र
५) शिक्षणाधिकारी (योजना) व यांनी गटशिक्षणाधिकारी यांना त्यांच्या अधिनस्त विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख मुख्याध्यापक, यांच्याकडून गाव, केंद्र व शाळास्तरानुसार नियोजन तयार करण्याच्या सूचना देवून अंमलबजावणी करावी.
६) केंद्रप्रमुख यांनी शाळानिहाय आवश्यक सर्वेक्षक शिक्षक संख्या निर्धारित करुन यादया तयार करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
७) केंद्रशाळेवर केंद्रप्रमुखांनी सर्व माध्यमाच्या, व्यवस्थापनाचे मुख्याध्यापक यांना विविध प्रपत्रात माहिती भरणेबाबत प्रशिक्षण दयावे. मुख्याध्यापक यांनी शाळास्तरावर सर्वेक्षणांसाठी आदेश प्राप्त सर्वेक्षक शिक्षक याना विहित नमून्याचे प्रपत्र भरणे बाबत माहिती देण्यात यावी. पंचायत समितीस्तरावर गटशिक्षणाधिकारी यांनी निरक्षरांच्या सर्वेक्षणाबाबत माहितीचे संकलन विषयतज्ञ व विशेष शिक्षक यांच्या मदतीने करुन तालुकास्तरावरील माहिती शिक्षणाधिकारी (योजना) यांना पाठवावी.
८) क्षेत्रिय सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यामिक / योजना), गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांचेवर निर्धारित करण्यात आलेली असून आपल्या अधिनस्त कर्मचा- यांकडून दिलेल्या तारखेप्रमाणे प्रत्यक्षात सर्वेक्षणांची सुरूवात करुन अहवाल विहित प्रपत्रात सादर करणे आवश्यक राहिल.
९) या सर्वेक्षणातून विविध स्तरावर प्राप्त होणारी सांख्यिकीय माहिती, निर्धारित करुन दिलेल्या विहित प्रपत्रात प्राप्त करून घेऊन शिक्षणाधिकारी (योजना) यांनी शिक्षण संचालनालय योजना यांना सादर करावी. सर्वेक्षणाच्या माहितीची ऑनलाईन गुगल लिंक तयार करण्यात येत असून त्यामध्ये वेळोवेळी माहिती भरणे अनिवार्य राहील.
शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले


प्रपत्रांची एक्सेल फाईल आवश्यक होती पीडीएफ ऑलरेडी आहेत
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना