माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत
मा. मुख्यमंत्र्यांच्या पत्राचे वाचन
करून अभिप्राय अपलोड करा
राज्यामध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान राबविण्यात आले, तसेच भरघोस प्रतिसाद मिळाला
CM Letter Feedback Link राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत संकेतस्थळ विकसित केलेले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांन शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रातील मजकूर व शिक्षण विषयक अभिप्राय हस्ताक्षरात लिहून त्याच फोटो उपरोक्त नमूद संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आहे. यामधून प्राप्त अभिप्रायांचा विचार राज्याच्या शैक्षणिक धोरण निश्चितीकरणात केला जाणार आहे. शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याच्या प्रक्रीयेत सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे.
गिनीज बुक रेकॉर्ड बाबत काही महत्वाच्या सूचना
• एकूण 3 विषयावर विद्यार्थी अभिप्राय लिहू शकतील
• मा मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्र
• आपल्या शाळेविषयी मत
• शिक्षणाचे जीवनातील महत्त्व
उपक्रमाचे नाव : Largest online photo album of "Handwritten Notes in 24 hours".
१) पालकांनी मा. मुख्यमंत्री महोदय यांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावयाचे आहे.
२) हे पत्र वाचून झाल्यावर त्यांनी छोटया वहीचे एक पान व एक बॉलपेन घ्यायचे आहे.
३) या पानावर मुलांनी बॉलपेनाने स्वतःच्या हस्ताक्षरात या पत्राविषयी त्यांचा शिक्षण विषयक अभिप्राय नमूद करणे अपेक्षित आहे. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना लेखन शक्य नसल्यास त्यांच्या पालकांच्या हस्ताक्षरात लेखन करता येईल पालकांना लेखन करता येत नाही त्यांच्या वतीने अन्य व्यक्तींकडून लेखन करुन घेता येईल.
४) हा अभिप्राय ५ ते ६ ओळीमध्ये असावा.
५) अभिप्राय लिहून झाल्यावर पालकांनी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमे-यात काढायचा आहे.
६) त्यानंतर शिक्षण विभागाच्या खालील वेबसाईटवर जाऊन स्वत:च्या नावाने रजिस्ट्रेशन करणे अपेक्षित आहे.
७) त्यानंतर हस्ताक्षरातला अभिप्रायाचा फोटो अपलोड करावयाचा आहे.
Step :-
• Upload handwritten note photo या बटनावर क्लिक करावे
• मोबाइल क्रमांक नमूद करावा
• पुनःश्च मोबाइल क्रमांक नमूद करावा
• Captcha दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा
• Continue बटनावर क्लिक करावे
• विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव, शाळेचे नाव, जिल्हा, तालुका निवडावा
• Continue बटनावर क्लिक करा
• मा. मुख्यमंत्री यांच्या पत्राविषयी / शिक्षण विषयक अभिप्रायांचा स्वतःच्या हस्ताक्षरातील फोटो अपलोड करावा
• Submit वर क्लिक करावे
• Congratulations असा संदेश दिसेल, म्हणजे आपला प्रतिसाद यशस्वी नोंदविला गेला आहे
धन्यवाद !
त्याप्रमाणे सर्व शाळास्तरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सूचना पोहोच होतील याची दक्षता घेण्यात यावी.
सदर उपक्रमाचा दिनांक २६.०२.२०२४ वेळ सकाळी ०९.०० ते
दिनांक २७.०२.२०२ सकाळी ०८.५९ आहे.
सदर दिवशी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो अपलोड करावयाचा आहे
मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा
MUKHYAMANTRI MAZI SHALA SUNDER SHALA
Mahacmletter
मा. मुख्यमंत्री यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे
ReplyDeleteMast aahe
DeleteCongratulations
ReplyDeleteEducation is very important
ReplyDeleteEducation is education .
DeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteउपक्रम चांगला आहे उपक्रम चांगला आहे पण नेट अजिबात चालत नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा अभिप्राय यामध्ये अपलोड करता येत नाही.
ReplyDeleteMajhi shala sundar shala
ReplyDeleteMajhi shala sunder shala
ReplyDeleteUpkram changla aahe pan abhipraay apload hot nahi aahe n... Aamch, kittekach
ReplyDeleteMaji shala sundar shala
ReplyDeleteअपलोड करायची तारीख वाढवून दिली तर बरं होईल.
ReplyDeleteअपलोड करायची तारीख वाढवून दिली तर बरं होईल.
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना