UDISE PLUS Online School Student Teacher Profile Certification

सन २०२३-२४ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमधील शाळा, विद्यार्थी व शिक्षक माहितीचे प्रमाणपत्र प्रमाणीत करणे

सन २०२३-२४ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमधील शाळा, विद्यार्थी व शिक्षक माहितीचे प्रमाणपत्र प्रमाणीत करून या कार्यालयास पाठविणेबाबत.

सन २०२३-२४ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीतील सर्व माहिती अंतिम झाली आहे. त्यामुळे जिल्हास्तर व तालुकास्तर शाळा, शिक्षक व विद्यार्थी प्रोफाईलचे प्रमाणपत्र भारत सरकारकडून तपासणीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

प्रणालीतील माहितीच्या आधारे समग्र शिक्षा, STARS व PM Shri या योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात येते. याच माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून आपल्या राज्याचा व जिल्ह्यांचा Performance Grading Index (PGI) काढण्यात येतो. त्यामुळे यु-डायस प्लस प्रणालीची माहिती तपासतांना या बाबींचा प्राधान्यांने विचार करण्यात यावा.

तरी आपल्या स्तरावरून यु-डायस प्लस प्रणालीतील सर्व माहिती तपासून दिनांक २९/०२/२०२४ पर्यंत यु-डायस प्लस प्रोफाईलचे प्रमाणपत्र प्रणालीत अपलोड करून एक प्रत mpspmah@gmail.com या ई-मेल ID वर या कार्यालयास सादर करणेसाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक/ प्रशासनाधिकारी यांना आदेशित करावे. मुदतीत प्रमाणपत्र अपलोड न झाल्यास माहिती अंतिम समजून भारत सरकारकडे पाठविण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

मा. मुख्यमंत्र्यांच्या पत्राचे वाचन 

करून अभिप्राय अपलोड करा 

खालील लिंक वर क्लिक करा

What's Up Group Join 

What's Up Group Join 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad