शिक्षण सप्ताह उपक्रम
दिवस सातवा शैक्षणिक
उत्कृष्टतेचा उत्सव ! संपूर्ण माहिती
शिक्षा सप्ताह
शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव
दिवस सातवा
रविवार दिनांक 28 जुलै 2024
विद्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालवला जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे.
विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने, कार्यरत आणि सेवानिवृत शिक्षक, शास्त्रज, सरकारी/निमशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे कर्मचारी, स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक, गृहिणी, आणि इतर कोणत्याही संस्था/समूह किंवा कंपनी यातील व्यक्ती त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करू शकता किंवा शाळेसाठी मालमत्ता/साहित्य/उपकरणे यांचे योगदान देऊ शकतात.
उद्दिष्टे -
1. शाळांचे सक्षमीकरण करणे.
2. लोकसमुदायाच्या माध्यमातून शालेय
3. शाळा व समाज यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणे.
4. समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उतरदायित्व निर्माण करणे.
विद्यांजली कार्यक्रमाचा व्याप्ती व वाढवण्यासाठी शिक्षा सप्ताहाच्या सहाव्या दिवशी पुढील उपक्रमांचे आयोजन केले जावे.
1. विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी करणे.
2. शाळेला मदत करणाऱ्या सक्रिय स्वयंसेवकांची नावे शाळेच्या दर्शनी फलकावर लिहिणे.
3. समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरुकता निर्माण करणे. त्यासाठी प्रभात फेऱ्या , पथनाट्य, पोस्टर मेकिंग, विद्यांजली कार्यक्रमासंदर्भात घोषवाक्ये स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
4. विद्यांजली पोर्टलवर स्थानिक समुदायाला स्वयंसेवक बनण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेमध्ये व समाजामध्ये स्वयंसेवक बनो अभियान राबविणे.
6. शालेय परिपाठामध्ये शिक्षक, विद्यार्थी व डायट मधील अधिकारी यांचे मार्फत विद्यांजली कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करणे
7. विद्यांजली कार्यक्रमाविषयी समाज माध्यमे, स्थानिक रेडिओ वाहिन्या, पी एम ई विद्या चॅनल्स यांच्या माध्यमातून जनजागृती करणे.
8. शालेय स्तरावर विद्यांजली कार्यक्रमाविषयी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची समाज माध्यमे व प्रसार माध्यमे याद्वारे प्रसिद्धी करण्यात यावी.
अपेक्षित परिणाम
1. विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी वाढेल
2. शाळांचे सक्षमीकरण होईल.
3. शाळा व समाज यामध्ये उत्तम नाते संबंध निर्माण होईल.
4. समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण होईल.
विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी
➤ प्रथम खालील लिंक वर क्लिक करा
सामाजिक शास्त्र विभाग
केंद्रशासन निर्देशानुसार संपूर्ण देशभरात दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या दरम्यान "शिक्षण सप्ताह" या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रस्तुत उपक्रमांतर्गत आठवड्यातील प्रत्येक दिवशी एका विशिष्ट उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रस्तुत शिक्षण सप्ताह दरम्यान शनिवार, दिनांक २७ जुलै, २०२४ रोजी "Eco Clubs for Mission Life / School Nutrition Day"
तिथी भोजन (स्नेहभोजन)
रविवार, दिनांक २८ जुलै, २०२४ रोजी "Community Involvement Day (Including Tithi bhojan, Vidyanjali etc." समुदास सहभाग दिवस (तिथी भोजन, विद्यांजली इ.) इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
वरील प्रमाणे नमूद उपक्रमांतर्गत "समुदास सहभाग दिवस" या दिवशी राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधून तिथी भोजन (स्नेहभोजन) उपक्रम राबविला जाईल याकरीता सर्व शाळांना प्रोत्साहीत करण्यात यावे तसेच सर्व शाळांमधून तिथी भोजन (स्नेहभोजन) उपक्रमाची अंमलबजावणी होईल
याकरीता क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत आवश्यक नियोजन करण्यात यावे.
केंद्रशासनाने निर्धारित केलेनुसार " तिथी भोजन (स्नेहभोजन) " उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी
करण्याकरीता खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
1. गावातील दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना उक्त विशेष दिवशी " तिथी भोजन (स्नेहभोजन)" देण्याकरीता आवाहन करण्यात यावे.
il. सर्व शाळामधून समुदाय सहभाग दिवशी " तिथी भोजन (स्नेहभोजन)" उपक्रमाचे आयोजन शाळेने करावे.
प्रस्तुत उपक्रमांतर्गत पूर्ण जेवण, मिठाई किंवा पूरक पोषक आहार (उदा. मोड आलेली कडधान्ये, शेंगदाणे, सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ते, मनुका, आक्रोड, बेदाणे, फळे, शिजविलेले पदार्थ, मिष्टांन्न) इत्यादीचा समावेश असलेले अन्न / आहार विद्यार्थ्यांना देण्यात यावा.
iv) " तिथी भोजन (स्नेहभोजन)" उपक्रमांतर्गत भोजनात कोणत्या पदार्थाचा समावेश करावा याबाबत संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने व देणाऱ्या व्यक्तीनी परस्पर सहमतीने एकत्रित निर्णय घ्यावा.
v) खाद्य पदार्थ ताजे व पौष्टिक असावे, तांदूळ /गहू/नाचणी, शेवगा शेंग/डाळी सोबत हिरव्या पालेभाज्या प्राधान्याने दिल्या जाव्यात. बाजारातील वेष्टनबध्द पदार्थ (जंक फूड) तसेच उघड्यावरील आणि शिळे अन्नपदार्थ विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नयेत, यासोबतच जंक फूडच्या हानिकारक प्रभावांबद्दल विद्यार्थी आणि पालक तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी.
vi) विद्यार्थी हे देखील त्यांच्या दैनंदिन जीवनात अन्न पदार्थांची नासाडी कमी करुन, ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जन कमी करण्याकरीता त्यांचे बहुमूल्य योगदान देऊ शकतात याची जाणीव सर्व विद्यार्थ्यांना करुन देण्यात यावी.
vii) खाद्य पदार्थाचे विद्यार्थ्यांना वितरण करताना वितरकाने शाळेत उपस्थित रहावे. तसेच खाद्य पदार्थ विद्यार्थ्यांना शाळेमध्येच व दुपारच्या सुट्टीत तथा शालेय वेळेतच देण्यात यावेत.
viii) सदर भोजनातून अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता संबंधित वितरक आणि शाळेने घेणे आवश्यक आहे. आहाराचे वितरणाकरीता आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी.
ix) समुदास सहभाग दिवस (तिथी भोजन, विद्यांजली इ.) उपक्रम राबविण्याकरीता संदर्भ ४ अन्वये दि. २३.०७.२०२४ रोजीच्या व्हि.सी. मध्ये देण्यात आलेल्या सर्व सूचना व निर्देशांचे पालन करुन उक्त उपक्रम अधिकाधिक शाळांमध्ये यशस्वीपणे राबविला जाईल याकरीता आवश्यक नियोजन आपले स्तरावरुन करण्यात यावे.
उक्त निर्देशाप्रमाणे दि. २८ जुलै, २०२४ रोजी "Community Involvement Day (Including Tithi bhojan, Vidyanjali etc." समुदास सहभाग दिवस (तिथी भोजन, विद्यांजली इ.) मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येईल तसेच राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमाबाबतची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर विहित वेळेत अद्यावत करणेत यावी.
➤ प्रथम खालील लिंक वर क्लिक करा
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना