राज्यातील शाळेमध्ये शिक्षण सप्ताह
साजरा होणार ! SCERT Pune
शिक्षण सप्ताह " साजरा करणेबाबत..
दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४
उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शिक्षण धोरण२०२ -० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ क्र. १ नुसार कळविण्यात आले आहे.
शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.
दिनांक 22 जुलै 2024 पासुन ते दिनांक 28 जुलै 2024 पर्यंत दिनांकानिहाय उपक्रम पुढीलप्रमाणे पाहुयात ..
दिनांक | उपक्रम |
दि.22.07.2024 | अध्ययन अध्यापक साहित्य दिवस |
दि.23.07.2024 | मुलभुत संख्याज्ञान व साक्षरता दिवस |
दि.24.07.2024 | क्रिडा दिवस |
दि.25.07.2024 | सांस्कृतिक दिवस |
दि.26.07.2024 | कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस |
दि.27.07.2024 | मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम / शालेय पोषण दिवस |
दि.28.07.2024 | समुदाय सहभाग दिवस |
संदर्भ क्र. १ तसेच सोबतच्या परिशिष्ट १ ते ७ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार शिक्षण सप्ताहामधील उपरोक्त तक्त्यातील उपक्रमांची अंमलबजावणी नेमून दिलेल्या कालावधीत आपण पूर्ण करावी.
शिक्षण सप्ताहादरम्यान आयोजित उपक्रमांची छायाचित्रे व माहिती Tracker वर upload करणेबाबत दिलेल्या विहीत नमुन्यामध्ये माहिती जतन करून ठेवावी व मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी.
सर्व उपक्रमांचे फोटो आपणांस यथावकाश उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंक सोबतच सद्यस्थितीत विविध समाजमाध्यमांवर जसे - फेसबुक, इन्स्टाग्राम,ट्वीटर इत्यादी वर शेअर करत असताना
#ShikshaSaptah
#NEP2020
#PMSHRI #FoundationalLiteracy&Numeracy
#Scertmaharashtra
हॅशटॅगचा वापर करावा.
नवीन नवीन Update
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना