Ads Area

Class Four And Seven Scholarship Exam Application Apply Time Table Information

इ. 4 थी व इ.7 वी शिष्यवृत्ती परीक्षा

वेळापत्रक जाहीर ! आवेदन 

भरण्याकरिता मुदतवाढ! MSCE Pune 

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) दिनांक २६ एप्रिल, २०२६ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना...

उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) दिनांक 26 एप्रिल, 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना दिनांक 30/12/2025 रोजी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक 30 डिसेंबर, 2025 ते 02 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक 06 मार्च, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. 

सदर प्रसिध्दीपत्रक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर प्रसिध्दीपत्रकास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे

शासनमान्य शाळांमधून सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ४ थी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता ७ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व य परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक ३०/१२/२०२५ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

शाळा नोंदणी लिंक 

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

      
  शाळा Login व विद्यार्थी नोंदणी लिंक 


➤ खालील लिंक वर क्लिक करा 

उपरोक्त परीक्षा दिनांक २६ एप्रिल, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी.

सोबत :- अधिसूचना

What's Up Group Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area