निपुण महाराष्ट्र चाचणी कशी घ्यावी
संपूर्ण मार्गदर्शन ! वाचा सविस्तर
भारत सरकारने निपुण भारत (NIPUN- National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy) अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता २ री पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यानुषंगाने इयत्ता २ री पेक्षा वरच्या वर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केल्या नाहीत, त्यानांही त्या प्राप्त करण्याची उचित संधी उपलब्ध करणे गरजेचे आहे म्हणून संदर्भ क्र.२ व ३ ची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
राज्यातील दुसरी ते पाचवी च्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृध्दींगत करण्याकरिता निपुण महाराष्ट्र अभियान व त्या अंतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
१) निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाचे ध्येय-
वर्गातील १०० टक्के विद्यार्थ्यांनी १०० टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे. परंतु, नियंत्रणाबाहेरील कारणांचा विचार करुन इ. २ री ते ५ वी च्या प्रत्येक वर्गातील किमान ७५ टक्के विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे असे ध्येय या अभियानांतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात येत आहे.
२) कृती कार्यक्रमाची व्याप्ती -
अ) सदरील कृती कार्यक्रम स्वयंअर्थसहायित व विना अनुदानित शाळा व तुकड्यांव्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या इ. २ री ते ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू राहील. (इयत्ता ६ वी ते ८ वीच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरुपात यात सहभागी होता येईल.)
आ) या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा व गणित विषयांसाठी या कृती कार्यक्रमासाठी ठरवून देण्यात आलेल्या अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
३) या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता परिशिष्ट १ व ३ मध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.
४) कृती कार्यक्रम कालावधी-
सदर कृती कार्यक्रम अंमलबजावणी कालावधी दिनांक ५ मार्च, २०२५ ते ३० जून, २०२५ असा राहील. यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमधील अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात यावी. अशा क्षमता विद्यार्थ्यांना पूर्ण क्षमतेने प्राप्त होण्यासाठी शालेय वेळेमध्येच संबंधित शिक्षकांनी उपाययोजना कराव्यात तसेच, यासाठी शालेय वेळेव्यतिरिक्त वेळ वापरणे आणि सुटीच्या कालावधीचा सदुपयोग करणे आवश्यक असल्यास याविषयी संबंधित शाळा मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी त्या त्या वेळी नियोजन करावे. शिक्षकांना आवश्यकतेनुसार सर्व शैक्षणिक सहाय्य (Academic support) मिळेल याचा पूर्ण प्रयत्न मुख्याध्यापकांनी करावा
मार्गदर्शन व्हिडिओ पहा
What's Up Group Join
➤ What's Up Group Join

आपली प्रतिक्रिया व सूचना