प्रतिक्षा संपली! बारावीचा निकाल आज जाहीर होणार
मोठी बातमी! उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या निकालाबाबत
बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड;
राज्यातील बारावीची परीक्षा (Class 12 Examination) निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक ०२ मे, २०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे वेबसाइट खालीलप्रमाणे आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Education Board) लवकरच इयत्ता १२वी परीक्षेचा निकाल जाहीर (12th Class Results Declared) करण्याची शक्यता आहे. दरम्यान, DigiLocker या अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘Class 12 Result 2026 Coming Soon…’ (Coming Soon – Indications) असा संदेश दिसू लागल्याने निकाल कधीही जाहीर होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निकाल जाहीर करण्यापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेतली जाईल. त्यानंतर अधिकृत संकेतस्थळ hscresult.mkcl.org वर निकालाची थेट लिंक सक्रिय करण्यात येईल.
लिंक सुरू झाल्यानंतर विद्यार्थी आपला रोल नंबर आणि आईचे माहेरचे नाव टाकून सहज निकाल पाहू शकतील. तसेच गुणपत्रिकेची डिजिटल प्रत डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध असेल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४.
मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
सदर निकालाबाबतचा अन्य तपशील खालीलप्रमाणे
१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
Maharashtra Board HSC And SSC Result 2026 Updates
दिनांक १७ मे पासून अकरावी प्रवेश
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १० दिनांक फेब्रुवारी ते दिनांक ११ मार्च तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दिनांक २० फेब्रुवारी ते दिनांक १८ मार्च या काळात पार पडली.
सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून गुणांचे संकलन देखील झाले आहे.
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दिनांक १० फेब्रुवारी ते दिनांक ११ मार्च तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दिनांक २० फेब्रुवारी ते दिनांक १८ मार्च या काळात पार पडली.
सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून गुणांचे संकलन देखील झाले आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या निकालाबाबत...
महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
दिनांक १५ मेपूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दहावी-बारावीची परीक्षा उत्तीर्ण न झालेले अनेकजण बोर्डाचा लोगो वापरून बनावट गुणपत्रिका, बोर्ड प्रमाणपत्र तयार करतात. पण, आता असे गैरप्रकार कायमचे बंद होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र स्वतंत्र नव्हे एकाच पानावर मिळणार आहे. त्यावर संबंधित विद्यार्थ्याचा फोटो असणार आहे.
याशिवाय त्यावर क्युआर कोड देखील असणार आहे. तो क्युआर कोड स्कॅन केल्यावर विद्यार्थ्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती समजणार आहे. पहिल्यांदाच बोर्डाने हा बदल केला असून त्यातून बनावटगिरीला कायमचा चाप बसणार आहे. दरम्यान, आता सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून आता गुणपत्रिकांची छपाई सुरु असल्याचेही बोर्डातील सूत्रांनी सांगितले. निकालानंतर साधारणत: एक महिन्याने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र मिळणार आहे.
निकाल पाहताना प्रवेशपत्र (Hall Ticket) जवळ ठेवा.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स
तुमचा निकाल खालील वेबसाईट्सवर उपलब्ध असेल:
hscresult.mkcl.org
results.digilocker.gov.in
mahahsscboard.in
➤ What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना