Ads Area

Class Eleventh Central Online Admission Process Information

इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश 

प्रक्रिया 2026-27 – नियमित फेरी 2 

वेळापत्रक सूचना संपूर्ण माहिती 

प्रिय विद्यार्थी व पालक,

शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून इयत्ता 11 वी प्रवेशासाठी नियमित फेरी-2 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 

कृपया खालील बाबी वेळेत पूर्ण करा :

1. प्रवेश अर्ज भरणे व लॉक करणे

कालावधी : दिनांक 06 जून 2026 सकाळी 08.00 ते 09 जून 2026 सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत*  

- नवीन विद्यार्थ्यांनी नोंदणी व भाग-1 मधील दुरुस्ती करा.  

- पसंतीक्रम अर्ज भाग-2 भरा. कमीत कमी 1 व जास्तीत जास्त 10 कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरा.  

- आरक्षणानुसार कनिष्ठ महाविद्यालये मिळतील.  

- महत्त्वाचे : प्रवेश अर्ज लॉक करणे अनिवार्य आहे.

- कोटा प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी कोटा पसंतीक्रमही ऑनलाइन नोंदवून लॉक करा.

2. अलॉटमेंट प्रक्रिया

कालावधी : 10 जून ते 12 जून 2026

- पात्र विद्यार्थ्यांना महाविद्यालय वाटप केले जाईल.

3. वाटप यादी प्रसिद्धी

दिनांक 13 जून 2026 सकाळी 10.00 वाजता

- वाटप झालेल्या महाविद्यालयाची यादी पोर्टलवर पाहा.  

- SMS द्वारेही सूचना मिळेल.

4. प्रवेश निश्चित करणे

दिनांक 13 जून 2026 दुपारी 12.00 ते 16 जून 2026 सायंकाळी 6.00 पर्यंत 

- वाटप झालेल्या महाविद्यालयात जाऊन कागदपत्रे पडताळणी करा व शुल्क भरा.  

- पोर्टलवर “Proceed for Admission” करून प्रवेश निश्चित करा.  

- कोट्यातून पात्र विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करा.

5. पुढील फेरी

 दिनांक 17 जून 2026 : कनिष्ठ महाविद्यालय संबंधित कामकाज  

दिनांक 18 जून 2026 सायं. 6.00 : तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर  

- दिनांक 19 जून 2026 सकाळी 11.00 : रिक्त जागा प्रदर्शन

टीप : या फेरीत सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज अनलॉक केले जाणार आहेत. त्यामुळे सर्वांनी भाग-1 व भाग-2 अर्ज वेळेत लॉक करणे आवश्यक आहे.  

वेळापत्रकानुसार कार्यवाही पूर्ण न केल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो. अधिक माहितीसाठी FYJC पोर्टल पहा किंवा संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधा.

What's Up Grotup Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad