Ads Area

Rivers in India Full Information

भारतातील प्रमुख नद्यांविषयी माहिती* 

Rivers in India Full Information

*(१) तापी नदी :--*    

-- तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. तिचा उगम सातपुडा पर्वतात मुलताईजवळ होतो.
 तापी नदी हि महाराष्ट्रातून वाहते तसेच गुजरात राज्यातून वाहते त्यानंतर अरबी समुद्रास मिळते. पूर्णा ही तापी नदीची प्रमुख उपनदी आहे. 

-------------------------------------------------

*(२) गोदावरी नदी :--*

गोदावरी नदी ही भारतीय पठारावरील सर्वांत जास्त लांब अशी नदी आहे. गोदावरी नदी सह्याद्रीमध्ये त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते.
 ही नदी महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या राज्यातून वाहते व बंगालच्या उपसागरास मिळते. प्रवरा,मांजरा, प्राणहिता, इंद्रावती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. 

---------------------------------------------------

*(३)कृष्णा नदी :--*

कृष्णा  नदी सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर येथे  उगम पावते. 

हि नदी महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून वाहत जाते व बंगालच्या  समुद्राला मिळते.
 भीमा, तुंगभद्रा, पंचगंगा या कृष्णेच्या मुख्य उपनद्या आहेत. 

-------------------------------------------------

*(४) गंगा नदी :--*

-- गंगा नदी ही भारतातील सर्वांत जास्त लांबीची 
नदी आहे. या नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो.
 ही नदी उत्तरांचल,उत्तरप्रदेश व बिहार या राज्यांतून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. 

---------------------------------------------------

*(५) सिंधू नदी :--*

--  सिंधू नदीच्या काठीच भारतीय संस्कृतीचा उगम व विकास झाला.
 ही नदी हिमालयात मान सरोवराजवळ उगम पावते. ती जम्मू आणि काश्मीरमधून वाहत जाऊन पाकिस्तानात प्रवेश करते व पुढे ती अरबी समुद्रास मिळते.       
                         

============================


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad