रस्ते सुरक्षा महिन्यांतर्गत राज्यातील
सर्व शिक्षकांसाठी आयोजित
"रस्तासुरक्षा "
संदर्भातील ऑनलाईन
सत्राबाबत...
उपरोक्त विषयास अनुसरून,सद्यस्थितीमध्ये रस्ते सुरक्षा हा महत्वाचा विषय बनलेला असून रस्त्यावरील सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना पाक्यपुस्तकातील विविध घटकांच्या माध्यमातून उद्बोधन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.वासाठीच रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक संकल्पनांचा अंतर्भाव अभ्यासक्रमात देखील काही अंशी करण्यात आलेला आहे.
शालेय अध्यापनातून शिक्षकांना सदर विषयाच्या अनुषंगाने अधिक माहिती प्राप्त व्हावी व शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा व त्याचे महत्व लक्षात यावे
तसेच राज्यातील विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये रस्ते सुरक्षेबाबत जागृती निर्माण व्हावी याउद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड राज्य परिवहन कार्यालय, पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने
दिनांक ६ फेब्रुवारी, २०२१ रोजी
दुपारी ४.०० ते ५ :४५ या वेळेमध्ये *रस्ता सुरक्षा या आनलाईन सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरव्या सत्रामध्ये रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी व नियमांचे पालन याबाबत राज्य परिवहन कार्यालय, पुणे विभाग
येथील तज्ञांमार्फत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
सदर ऑनलाईन सत्राचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
सदरच्या सत्रामच्ये सहभागी व्हावे.
सत्रामध्ये सहभागी शिक्षकांसाठी सत्राच्या वेळी प्रत्याभरण लिंक देण्यात येईल,सदर प्रत्याभरण लिंक यशस्वीपणे भरणाच्या शिक्षकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल
खालील लिंक वर क्लिक करा
Live
सदरच्या ऑनलाईन सत्रामध्ये देण्यात येणारी माहिती अत्यंत महत्वाची असल्याने या सत्रास उपस्थित राहणेबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षकांना अवगत करण्यात यावे.


छान प्रशिक्षण
ReplyDeleteप्रशिक्षणात मार्गदर्शन छान मिळत आहे
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice Information
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना