Shaala Siddhi All Information Maharashtra

शाळा सिद्धी सर्व माहिती

Shaala Siddhi 2022 - 2023
 All Information Maharashtra

शाळेची माहिती शाळा सिद्धि माहिती भरण्याकरिता वेबसाईट सुरू झाली आहे
*शाळा सिद्धी मूल्यमापन*
दिनांक 30 एप्रिल 2023  पर्यंत पूर्ण करणे

Shala Siddhi

शाळेची शाळा सिद्धी माहिती भरताना काही आवश्यक सूचना


प्रमुख क्षेत्र १ - शाळेचे सामर्थ्य स्त्रोत : उपलब्धता, पर्याप्तता 

स्तर - १.   प्रत्येकी एक गुण‌ ( 12गुण )

स्तर -२.    प्रत्येकी दोन गुण ( 24गुण )

स्तर -३.    प्रत्येकी तीन गुण ( 36गुण )

एकूण. 36 गुण 

गाभा मानके

शालेय परिसर

क्रीडांगण आणि क्रीडा साधने साहित्यासह

वर्गखोल्या आणि इतर

खोल्या

विद्युत आणि विद्युत उपकरणे

ग्रंथालय

प्रयोगशाळा

संगणक (जेथे तरतूद उपलब्ध आहे.)

उतार रस्ता (Ramp)

मध्यान्ह भोजन-

उपलब्ध स्वयंपाकगृह आणि भांडी 

पेयजल

हात धुण्याची सुविधा

स्वच्छता-गृहे

प्रमुख क्षेत्र २ अध्यापन - अध्ययन आणि

 मुल्यांकन


स्तर - १.   प्रत्येकी एक गुण‌ ( 9 गुण )

स्तर -२.    प्रत्येकी दोन गुण ( 18गुण )

स्तर -३.    प्रत्येकी तीन गुण ( 27गुण )

एकूण. 27 गुण 

गाभा मानके

शिक्षकांना विध्यार्थ्यांविषयी असलेली जाणीव

शिक्षकांचे विषयज्ञान व अध्यापन कौशल्याचे ज्ञान

अध्यापनाचे नियोजन

अध्ययन पोषक वातावरण निर्मिती

वर्ग व्यवस्थापन

विद्यार्थी मुल्यांकन

अध्यापन अध्ययन संसाधनांचा वापर

शिक्षकांचे स्वतःच्या अध्यापन - अध्ययन प्रक्रियेबाबत चिंतन / विचार

प्रमुख क्षेत्र ३ - विद्यार्थ्यांची प्रगती,

 संपादणूक आणि विकास

स्तर - १.   प्रत्येकी एक गुण‌ ( 5 गुण )

स्तर -२.    प्रत्येकी दोन गुण ( 10गुण )

स्तर -३.    प्रत्येकी तीन गुण ( 15गुण )

एकूण. 15 गुण 

गाभा मानके

विद्यार्थी उपस्थिती

विद्यार्थी सहभाग आणि कार्यप्रवणता

विद्यार्थी प्रगती

विध्यार्थ्याचा वैयक्तिक आणि सामाजिक विकास

विद्यार्थी संपादणूक

प्रमुख क्षेत्र ४ - शिक्षकांची कामगिरी

 आणि व्यावसायिक विकासाचे

 व्यवस्थापन

स्तर - १.   प्रत्येकी एक गुण‌ ( 6 गुण )

स्तर -२.    प्रत्येकी दोन गुण ( 12गुण )

स्तर -३.    प्रत्येकी तीन गुण ( 18गुण )

एकूण. 18 गुण 

गाभा मानके

नवीन शिक्षकांचे उद़ बोधन

|शिक्षक उपस्थिती

नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कामगिरी ध्येये स्पष्ट करणे

शिक्षकांच्या कामगिरीची देखरेख

शिक्षकांची व्यावसायिक प्रगती

प्रमुख क्षेत्र ५ - शालेय नेतृत्व आणि

 व्यवस्थापन

स्तर - १.   प्रत्येकी एक गुण‌ ( 4 गुण )

स्तर -२.    प्रत्येकी दोन गुण ( 8 गुण )

स्तर -३.    प्रत्येकी तीन गुण ( 12गुण )

एकूण. 12 गुण 

गाभा मानके

दृष्टी निर्मिती व दिशा निश्चितीकरण

बदलांचे व सुधारणांचे नेतृत्व

अध्ययन व अध्यापनाचे नेतृत्व

शालेय व्यवस्थापनाचे नेतृत्व

प्रमुख क्षेत्र ६ - समावेशान, आरोग्य

 आणि संरक्षण

स्तर - १.   प्रत्येकी एक गुण‌ ( 5 गुण )

स्तर -२.    प्रत्येकी दोन गुण ( 10गुण )

स्तर -३.    प्रत्येकी तीन गुण ( 15गुण )

एकूण. 15 गुण 

गाभा मानके

समावेशित संस्कृती

गरजाधिष्ठित बालकांचे समावेशन

शारीरिक सुरक्षा

मानसिक सुरक्षा

आरोग्य आणि स्वच्छता

प्रमुख क्षेत्र ७ - उत्पादक समाजाचा

 सहभाग

स्तर - १.   प्रत्येकी एक गुण‌ ( 5 गुण )

स्तर -२.    प्रत्येकी दोन गुण ( 10गुण )

स्तर -३.    प्रत्येकी तीन गुण ( 15गुण )

एकूण. 15 गुण 

गाभा मानके

शाळा व्यवस्थापन समिती/ शाळा विकास व्यवस्थापन समितीचे
संघटन आणि व्यवस्थापन

शाळा विकासामधील भूमिका

शाळा - समाज संधान

समाज एक अध्ययन स्त्रोत

समाज सबलीकरण

प्राप्त झालेले गुण व श्रेणी 


 ११२ ते १३८ गुण असल्यास   "अ" श्रेणी

६९ ते १११ गुण असल्यास.     "ब" श्रेणी

६८ किंवा त्यापेक्षा कमी गुण    "क" श्रेणी

नमुना

Download link

शाळा सिद्धी नमुनाClick Here
शाळा सिद्धी नमुनाClick Here
Action प्लॅनClick Here
Action प्लॅनClick Here
Action प्लॅन ExClick Here
शाळा सिद्धी Excel SheetClick Here
Action प्लॅन ExClick Here



खालील लिंक वर क्लिक करून शाळेची माहिती भरा

*महत्वाचे व तात्काळ*!

         @ शाळासिद्धी @

~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*शाळासिद्धि कार्यक्रमांतर्गत शाळाचे सन 2021-22 चे  स्वयंमूल्यमापन पूर्ण करणे बाबत*..     
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
         जिल्ह्यातील सर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणीकरण करून घेणे व शाळांची गुणवत्ता आश्वासीत करणे महत्त्वाचे असून शैक्षणिक,भौतिक तसेच संस्थात्मक गुणवत्ता वाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरून शाळासिद्धी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे.त्यानुसार *जिल्ह्यातील 100% शाळांचे स्वयंमूल्यमापन निपा,नवी दिल्ली यांच्या शाळासिद्धि वेब पोर्टल वर करणे आवश्यक आहे*. त्यानुसार दरवर्षी राज्यातील 100% शाळांचे स्वयंमूल्यमापन करावयाचे आहे.
यादृष्टीने आपल्या स्तरावरून सर्व शाळांना पुढील सूचना देण्यात याव्या.
• शाळासिद्धी कार्यक्रमासाठी निपा,नवी दिल्ली यांच्या www.shalasiddhi.niepa.ac.in

पोर्टल वरील सन 2021 - 22 च्या शाळांच्या स्वयंमूल्यमापनाची टॅब सुरू झाली आहे.
• सर्व शाळांनी या आपल्या शाळेचे स्वयंमूल्यमापन पूर्ण करून त्याची माहिती दिनांक 30 एप्रिल 2022 पर्यंत शाळासिद्धि वेब पोर्टलवर भरावयाची आहे.
• शाळासिद्धी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती या वेब पोर्टलवर आहे.
• वेबपोर्टल चा वापर कसा करावा यासाठी वेबपोर्टलवर माहिती (usermanual)देण्यात आली आहे.
• मराठी माध्यमाची शाळासिद्धी पुस्तिका देखील वेबपोर्टलवर उपलब्ध आहे.
• दिनांक 25 मार्च 2019 रोजी झालेले शाळासिद्धि स्वयंमूल्यमापन वेबिनार 


Webinar Link


या यूट्यूब च्या लिंक वर उपलब्ध आहे.
• सर्व शाळांनी सन 2021-22 मधील स्वयंमूल्यमापन सदर वेबिनार मधील निपा, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनांनुसार पूर्ण करावे
• स्वयंमूल्यमापन करताना मुख्याध्यापकांनी शाळासिद्धीची स्वतंत्र संचिका करून त्यात युजरनेम आणि पासवर्ड स्वतःच्या ताब्यात ठेवावे.
• मुख्याध्यापकांची बदली झाल्यास कार्यभार हस्तांतरणाच्या वेळी सदर संचिका पुढील मुख्याध्यापकांकडे हस्तांतरित करावी.
• सन 2020-21चे स्वयंमूल्यमापन पूर्ण केलेल्या शाळांनी त्यांची हार्ड कॉपी सदर संचिकेत लावावी असे दरवर्षी करावे.

(काहीही अडचण आल्यास शाळासिद्धी संपर्क अधिकारी व तालुका अधिकारी यांच्याशी संपर्क करावा)

शाळासिद्धी संपूर्ण कार्यक्रम हा online आहे. यासाठी शाळासिद्धीचे राष्ट्रीय पोर्टल आहे.

आपल्याला या कार्यक्रमाचे संपूर्ण मार्गदर्शन या पोर्टलवर दिलेले आहे.

सुरुवातीला सन 2014-15 साली असलेला udise data या कार्यक्रमासाठी वापरण्यात आला.

त्यामुळे 2014-15 मध्ये udise प्राप्त  शाळांचा समावेश या कार्यक्रमात झाला.

इतर शाळांचा सहभाग नाही.

शाळासिध्दी हा विभाग Udise या विभागाकडून माहिती घेते.

Udise केंद्र शासन आणि NCERT चा स्वतंत्र विभाग आहे.


*आता राहिला प्रश्न नवीन शाळांना add करण्याचा*

उत्तर - ज्या शाळा शाळासिद्धी पोर्टलला add नाहीत त्यांनी शाळासिध्दी ऑफलाईन रेकॉर्ड ठेवावे.

Forget Password सुविधा

ज्या शाळांना, मुख्याध्यापकांना शाळासिद्धी login साठी password आठवत नाही त्यांनी याठिकाणी असलेल्या forget password या option चा वापर करावा. Registered मोबाईल नंबरवर OTP येतो. नंतर हवा तो पासवर्ड बदलून घ्यावा.

*मुख्याध्यापक मोबाईल नंबरवर otp येत नसल्यास केंद्रप्रमुख login open करावे. केंद्रातील सर्व शाळांचे otp दिसतात.*

*केंद्रप्रमुख login create करावे.*

ज्या पध्द्तीने सरल पोर्टल वर केंद्रप्रमुख login आहे

अगदी तसेच login शाळासिद्धी मध्ये आहे

*आपली प्रत्येक समस्या केंद्रस्तरावरच केंद्रप्रमुख सोडवू शकतात.*

*याशिवाय इतर समस्यांसाठी shalasiddhi website वर दिलेल्या email वर आपली समस्या letter pad वर लिहून स्कॅन करून mail करावा.*

*असिफ शेख*

*9860388096*

आपणास अधिक माहिती हवी असल्यास asiflshaikh1111@gmail.com वर Email करावा.

Tags

Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. सर अशी माहिती मिळणारा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट चा ग्रुप असेल तर नंबर नंबर पाठवा

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad