SSC And HSC Board Exam Question Paper

दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत बोर्डाचा मोठा निर्णय ! विद्यार्थ्यांसमोर प्रश्नपत्रिका उघडणार

SSC And HSC Board Exam Maharashtra

बोर्डाचा मोठा निर्णय..

पेपरफुटीचा धसका..! दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत बोर्डाचा मोठा निर्णय..

राज्यात गेल्या काही दिवसांत पेपरफुटीची अनेक प्रकरणे समोर आली. या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शक वातावरणात व्हाव्यात, यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.. 

त्यानुसार प्रश्नपत्रिका संचाचे पाकिट विद्यार्थ्यांसमोर फोडण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यासाठी “परीक्षेची यशस्वी तयारी” 

अशी घेणार काळजी

▪️ परीक्षा केंद्रावर 'थ्री लेअर' पाकिटात प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत.

▪️ प्रत्येक पाकिटात 25 प्रश्नपत्रिका असतील.

▪️ सोशल मीडियावर Social Media प्रश्नपत्रिका व्हायरल होऊ नये, यासाठी परीक्षा सुरू होण्यापूर्वी हे पाकिट विद्यार्थ्यांसमोरच फोडण्यात येणार.

मुख्य केंद्रातून उपकेंद्रावर परीक्षेपूर्वी 40 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका Board Exam Question Paper पोहोच केल्या जातील. 

प्रश्नपत्रिकेचे पाकीट केंद्र संचालक, पर्यवेक्षक हे विद्यार्थ्यांसमोर उघडणार आहेत. त्यामुळे पेपरफुटीला आळा बसेल, असा दावा राज्य शिक्षण मंडळाने केला आहे.


 दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षेत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी राज्य शिक्षण मंडळ आणखी काही कठोर निर्णय घेणार असल्याचीही माहिती देण्यात  आली आहे 

दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार ! - सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

तसे तुम्हाला माहिती असेल , दहावी बारावीची लेखी परीक्षा नको अशी याचिका विद्यार्थ्यांकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती 

 मात्र आज न्यायमूर्ती ए एम खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि सीटी रविकुमार यांनी ही याचिका फेटाळली आहे - त्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच Offline होणार आहेत - असे सुप्रीम कोर्टाने सांगितले

सवलतीचे क्रीडा गुण 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad