Senior Selected Salary Scale Online Training Start

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण सुरू होणार

 

राज्यातील शिक्षक/मुख्याध्यापक/अध्यापकाचार्य/प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये  सुरू होत आहे.

प्रशिक्षण हे ऑनलाईन

सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्यातील एकूण ९४,५४१ नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण (ई- कोर्स) पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.

सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण ५० ते ६० तासांचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येईल.

प्रशिक्षण प्रमाणपत्र

 त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार, पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थ्यास त्याच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.

सदर प्रशिक्षणबाबतची सर्व माहिती

 यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीनीं सदर उद्बोधन सत्रास उपस्थित रहावे.

YouTube Channel Link

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे App डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.


 याबाबतची सर्व माहिती दि. १ जून २०२२ रोजी आयोजित यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे दिली जाईल.

खालील लिंक वर क्लिक करा

प्रशिक्षण मार्गदर्शक व्हिडिओ 

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad