Student Entrance Ceremony Celebrated Education Commissioner

सन २०२२- २३ शैक्षणिक वर्षी 

शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा

होणार! शिक्षण आयुक्त

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दिनांक १५.०६.२०२२ व विदर्भातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दिनांक २७.०६.२०२२ रोजी प्रारंभ होणार आहे ( Maharashtra School )

प्रवेशोस्तवाच्या प्रसंगी स्वागत

 विद्यार्थ्यांना शाळेची ओढ व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी व दर्जेदार तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित आहे. 

या पार्श्वभुमीवर सत्र २०२२-२३ मध्ये इयत्ता १ली ते १२वी मधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशोस्तवाच्या प्रसंगी स्वागत करणे आवश्यक आहे. असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

त्यानुषंगाने पुढील प्रमाणे आपल्या स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी.

१. शाळेच्या परिसरातील (वयोगट ६ ते १४ वर्ष) वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश झाले असल्याची खात्री करण्यात यावी.

२. शाळाबाह्य झालेली किंवा असलेल्या बालकांचा शोध शाळापूर्व तयारीच्या कालावधीमध्ये करण्यात यावा. निर्दशनास आल्यास अशा बालकांना शाळेत प्रवेश देण्यात यावेत. ३. नजिकच्या परिसरातील दगडखानी, वीटभट्टी, बांधकामाचे स्थळ, उद्याने, बाजार पेठा,

पदपथ, सिग्नल, कुटीर उद्योग, कामगार वस्त्या या सारख्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात यावे.

४. शाळा प्रवेशाचा पहिल्या दिवशी आपण व आपल्या अधिनस्त प्रत्येक अधिकाऱ्यांनी व्यक्तीशः किमान एका शाळेत जाऊन विद्याथ्यांचे / शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्बोधन / प्रबोधन करावे.

५. विद्याथ्यांचे स्वागत फुल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य, स्थानिक स्त्रोत मध्ये उपलब्ध उपयोगी सामुग्री देऊन करण्यात यावे. 

विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण करण्यासाठी शाळेतील वातावरण चेतन्यमय आणि उत्साहवर्धक इ.चे व्यवस्थापन करण्यास मार्गदर्शन करावे.

६. मागील दोन वर्षात विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित नसल्याने सर्व विद्याथ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व शिक्षक यांचेशी विचार विमर्श करुन अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना, सेतु अभ्यासक्रम, इतर विविध शैक्षणिक सधनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उद्बोधन व सहकार्य करावे.

१७. शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाची स्थानिक पातळीवरील प्रसार माध्यमाद्वारे प्रसिद्धी करण्यात यावी.

८. शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थ्याचे, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, इ. यांचे सहकार्य घेण्यात यावे.

९. तसेच, संदर्भ क्र. १ व २ मधील शासन निर्णयातील मार्गदर्शक निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी , अशी माहिती

आयुक्त शिक्षण,महाराष्ट्र राज्य, पुणे 

मा. श्री. सूरज मांढरे, भा.प्र.से. यांनी दिली

सेतू अभ्यासक्रम

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad