Scholarship Examination Date Postponed

 इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा 

२०२२ ची परीक्षा पुढे ढकलली

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
 व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
२०२२ परीक्षा पुढे ढकलली

Scholarship Examination Date Postponed

उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दिनांक २०/०७/२०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत संदर्भ क्र. २ च्या प्रसिध्दीपत्रकान्वये जाहिर करण्यात आले होते.

शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

नवीन तारीख दिनांक ३१/०७/२०२२

तथापि सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता सदर शिष्यवृत्ती परीक्षा २०२२  हि 

 दिनांक २०/०७/२०२२ ऐवजी

 रविवार दिनांक ३१/०७/२०२२ रोजी घेण्यात येईल. 

यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दिनांक ३१/०७/२०२२ च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.

असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

सदर प्रसिध्दीपत्रकास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रावरून विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी, अशी आपणास विनंती आहे.

सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक यांना सुचित करावे

उपरोक्तनुसार झालेल्या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad