Setu Abhayas Students Study Status

सेतू अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची

अध्ययन स्थितीची तपासणी होणार

Study status of Setu Course students will be checked

सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासणेबाबत

Bridge Course
 कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/संशोधन/सेतू अभ्यास / २०२२-२३/२९०४, दि. १७/०६/२०२२

सेतू अभ्यास सर्वेक्षण - उत्तर चाचणी पत्र


 उपरोक्त विषयानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत राज्यातील विद्यार्थ्यांचे अध्ययन क्षय भरून काढण्यासाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी संशोधन विभागामार्फत संशोधन हाती घेण्यात आले आहे. याकरिता राज्यातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याच्या संदर्भात इयत्ता २ री ते १० वी या इयत्तेतील विद्यार्थ्याची सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी पूर्वीची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी सर्व्हे मंकी लिंकच्या माध्यमातून पूर्व चाचणीद्वारे माहिती संकलन करण्यात आलेली आहे.

 त्यानुसार या संशोधनासाठी सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील सर्व्हे मंकी लिंकमध्ये देण्यात आलेल्या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपल्या अधिनस्थ वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित शिक्षण तज्ज्ञ व विशेष शिक्षक यांच्या सहकार्याने सोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात यावी.
 तसेच यापूर्वी पूर्व चाचणीमध्ये ज्या विद्यार्थ्यांकडून प्रश्नावली सोडवून घेण्यात आली होती, त्याच विद्यार्थ्यांची उत्तर चाचणी सोडवून घेण्याविषयी अवगत करावे. 
सदर संशोधन हे कालमर्यादित असल्याने पुढील नियोजनाप्रमाणे https://www.research.net/r/Bridgecoursepoststudy22 

या लिंकद्वारे विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात यावी.

अंमलबजावणी कालावधी

 उत्तर चाचणी

 राज्यातील शाळा (विदर्भ वगळून)

 दि. २७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२२ (८ दिवस)

 विदर्भातील शाळा

 दि. ११ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२२ (८ दिवस)

 उपरोक्त संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या स्तरावरून यासंदर्भात आदेशित करावे. 
असे परिपत्रक शिक्षण विभागाने निर्गमित  केले आहे

तसेच आपल्या स्तरावरून याबाबतचा आढावा घ्यावा. आपल्या अधिनस्थ अधिकारी व कर्मचारी यांनी किती विद्यार्थ्यांची माहिती

 संकलित केली याबद्दलचा गोषवारा संशोधन विभागाच्या researchdept@maa.ac.in या ई-मेलवर पाठविण्यात यावा. याबाबतच्या आवश्यक मार्गदर्शक सूचना सोबत जोडण्यात आलेल्या आहेत.

 (मूळ प्रत मा. संचालक महोदय यांनी मान्य केली आहे.)

सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे ३०.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad