Scholarship Exam For Students Changed Schools Center Near School

शाळा बदललेल्या विद्यार्थ्यांना शाळेजवळील परीक्षा केंद्रावर स्कॉलरशिप परीक्षा देता येईल ! आयुक्त राज्य परीक्षा परिषद पुणे

वर्ग ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा

स्थलांतर केलेल्या किंवा शाळा बदललेल्या विद्यार्थ्यांना शाळेजवळील परीक्षा केंद्रावर स्कॉलरशिप परीक्षा देण्याची सवलत मिळणेबाबत
Scholarship Exam

शिष्यवृत्ती परीक्षा २०२२

उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दिनांक ३१/०७/२०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे

आजचा शासन परिपत्रक दिनांक २२ जुलै २०२२

उपरोक्त विषयाच्या संदर्भीय पत्रान्वये शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र वितरण शाळेत सुरू झाले आहे. कोरोना काळात अनेक विद्यार्थ्यांनी स्थलांतर केलेले आहे किंवा नवीन शाळेत प्रवेश घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी मूळ शाळेत असताना नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे ते सर्व गैरसोयीचे ठरेल. त्यामुळे सदर बाबींचा विचार करून स्थलांतर केलेल्या किंवा शाळा बदललेल्या विद्यार्थ्यांना शाळेजवळील परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यास मुभा देवून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती केलेली आहे.

त्यानुसार आपणास कळविण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ ची परीक्षा दिनांक ३१/०७/२०२२ रोजी घेण्यात येणार असून सदर परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्याने जिल्हा बदल / केंद्रबदलाची मागणी केल्यास सदर प्रकरणी तात्काळ कार्यवाही करून विद्यार्थ्यांच्या जवळपास त्या माध्यमाच्या अतिरिक्त उपलब्ध असलेल्या प्रश्नपत्रिकांची संख्या लक्षात घेऊन त्यानुसार परीक्षा केंद्र बदलाचे पत्र दिले जाते.
 त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता परिषद स्तरावरून घेण्यात येत आहे असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे
माहितीस्तव सादर

आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area