Nipun Bharat Abhiyan Teacher Induction Session

निपुण भारत अभियान केंद्रस्तरीय शिक्षक एक दिवसीय उद्बोधन सत्राचे आयोजन

केंद्रस्तरावरून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील बालकांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान [Foundational Literacy & Nurneracy (FLN) ] यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. त्यासाठी केंद्रशासनामार्फत दिनांक ५ जुलै २०२१ रोजी निपुण भारत अभियान सुरू करण्यात आले आहे. निपुण भारत अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित होण्यासाठी राज्यात विविध उपक्रम / कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

निपुण भारत अभियानाबाबत मुख्याध्यापक, शिक्षक तथा पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी यांच्यात जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. या अभियानांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने शिक्षकांना त्यांची भूमिका स्पष्ट होण्यासाठी समूह साधन केंद्रातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांसाठी (इ. १ ते ५ च्या शिक्षकांसाठी) व अंगणवाडी सेविकांसाठी दिनांक ५ ऑगस्ट किंवा दिनांक ६ ऑगस्ट २०२२ रोजी निपुण भारत अभियान एक दिवसीय केंद्रस्तरीय शिक्षक उद्बोधन सत्र सोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्यक्षपणे घेण्यात यावे. जिल्हास्तरावरून प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, प्रशासन अधिकारी (मनपा) यांच्या समन्वयाने संपूर्ण नियोजन करावे. निपुण भारत अभियान अंतर्गत केंद्रस्तरीय शिक्षक उद्बोधन सत्र या उपक्रमाच्या पूर्वतयारीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत दिनांक २९ जुलै २०२२ रोजी दुपारी ३:३० वाजता राज्यस्तरीय ऑनलाइन उद्बोधन बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ऑनलाइन कार्यशाळेसाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व जिल्हे), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, प्रशासन अधिकारी म. न. पा/न. पा, निपुण भारत जिल्हा नोडल अधिकारी यांनी उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून उचित आदेश देण्यात यावेत. सदर ऑनलाईन बैठकीची झूम लिंक आपणास मेलद्वारे कळविण्यात येईल.

केंद्रस्तरीय उद्बोधन सत्रापूर्वी जिल्हास्तरावर तालुकास्तरीय सुलभकांचे तसेच तालुकास्तरावर केंद्रस्तरीय सुलभकांचे प्रत्यक्ष उद्बोधन बैठकीचे आयोजन करावे. 

सदर बैठकीमध्ये राज्यस्तरावरून करण्यात आलेले मार्गदर्शन तसेच सूचनांचे प्रसारण योग्य पद्धतीने करण्यात यावे. आपल्या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे नियोजन असल्यास त्यासाठी वेगळे नियोजन न करता हेच उद्बोधन सत्र इयत्ता १ ते ५ च्या शिक्षकांसाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद म्हणून गृहित धरावे. 

इयत्ता ६ ते ८ च्या शिक्षकांसाठी शिक्षण परिषदेबाबत स्वतंत्रपणे सूचना देण्यात येतील. या संदर्भात आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करण्यात यावी ही विनंती.

केंद्रस्तरीय निपुण भारत शिक्षक उद्बोधन सत्राच्या अंमलबजावणी बाबतच्या मार्गदर्शक सूचना

१) दिलेल्या दिवशी वेळापत्रकाप्रमाणे शिक्षक उद्बोधन सत्राचे आयोजन सर्व केंद्रातून करण्यात यावे. 

२) या सत्राचे आयोजन केंद्रातील सर्व शाळांना मध्यवर्ती असणाऱ्या शाळेत / सभागृहात करण्यात यावे,

३) आयोजित करण्यात येणान्या शाळा / सभागृहामध्ये सत्रासाठी आवश्यक ध्वनी व्यवस्था / L.C.D सुविधा उपलब्ध असावी.

४) तालुकास्तरावर उद्बोधन सत्राबद्दल ज्या सुलभकांचे सुलमन झालेले आहे त्यांनीच केंद्रस्तरावरील उद्बोधन सत्रांमध्ये मार्गदर्शन करावे.

५) सत्रातील विविध विषयांबद्दल व्याख्यान पद्धतीने मार्गदर्शन करणेऐवजी गट चर्चा / गटकार्य याला प्राधान्य देण्यात यावे.

६) राज्यस्तरावरून FLN च्या अनुषंगाने वितरीत करण्यात आलेले साहित्य शिक्षकांना उद्बोधन सत्रामध्ये प्रत्यक्ष दाखवून त्यावर चर्चा घडवून आणावी. चर्चेतील मुद्द्यांची नोंद घेण्यात यावी.

७) सुलभकांनी www.education.gov.in केंद्रशासनाच्या या संकेत स्थळावर उपलब्ध असणाऱ्या निपुण भारत अभियान मार्गदर्शक सूचनांचे वाचन करावे व त्या आधारे सखोल मार्गदर्शन करण्यात यावे.

८) सदर उद्बोधन सत्रामध्ये विषय सोडून इतर कोणतेही सत्कार समारंभ किंवा अशैक्षणिक कामकाज करण्यात येवू नये.

९) सदर उपक्रमास विविध समाज माध्यमातून योग्य ती प्रसिद्धी देण्यात यावी. त्यासाठी #NIPUNMAHA 22 या हॅशटॅगचा वापर करण्यात यावा.

असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

राज्यात सन २०२६-२७ पर्यंत इयत्ता ३ री पर्यंतच्या १००% विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी तसेच इयत्ता ३ री पुढे गेलेल्या तथापि, अपेक्षित क्षमता प्राप्त न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी "निपुण भारत" अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी करण्यास शासन मान्यता देत असून पुढीलप्रमाणे दिशानिर्देश करीत आहे :

१. भाषिक कौशल्ये :- 

३ ते ९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा प्रारंभिक भाषा विकास होण्यासाठी

मातृभाषेमध्ये मौखिक भाषा ज्ञान, समजपूर्वक ऐकणे व त्याचे आकलन, मुद्रणशास्त्र व उच्चारशास्त्र यांच्या विकासाची जाणीव व लेखन कौशल्याचा विकास होणे गरजेचे आहे. भाषिक कौशल्ये प्राप्त होण्यासाठी भाषेचे पूर्वज्ञान मदतगार ठरेल. ज्या विद्यार्थ्यांचा मातृभाषेचा पाया मजबूत असतो, ते विद्यार्थी इंग्रजी वा अन्य भाषा अधिक सहजतेने शिक शकतात.

पायाभूत साक्षरतेचे घटक:

१.१. मौखिक भाषा विकासः- लेखन व वाचनाची कौशल्ये विकसित करण्यासाठी मौखिक भाषेचा विकास महत्त्वाचा आहे.

१.२. उच्चार शास्त्राची जाणीव:- शब्दांची लय व ध्वनीची जाणीव या बाबींचा योग्य वापर होणे गरेजेचे आहे.

१.३. सांकेतिक भाषा/लिपी समजून घेणे:- यामध्ये छापील मजकूरांचे आकलन करण्याची क्षमता, अक्षरांचे ज्ञान, सांकेतिक भाषा, लिपी समजून घेणे, शब्द ओळखणे.

१.४. शब्द संग्रहः- मौखिक शब्द संग्रह, वाचन / लेखन शब्दसंग्रह व शब्दांच्या विविध अर्थछटा.

१.५. वाचन व आकलन:- मजकूराचे वाचन करून अर्थ समजून घेणे, माहिती प्राप्त करणे व मजकूराचे स्पष्टीकरण करणे.

१.६. वाचनातील ओघवतेपणा:- मजकूर अचूकपणे व लयबद्ध वाचणे, अभिव्यक्ती व आकलन.

१.७. लेखन:- अक्षरे व शब्द लिहिणे, अभिव्यक्तीसाठी लिहिणे याची क्षमता.

१.८. आकलन:- छापील मजकूर/पुस्तके यामुळे आकलन कौशल्ये विकसित होण्यास मदत.

१.९. वाचन संस्कृती / वाचनाकडे कल:- यामध्ये विविध तऱ्हेची पुस्तके व इतर वाचन साहित्य वाचण्याकडे कल असणे.

२. पायाभूत संख्या साक्षरता, संख्याज्ञान व गणितीय कौशल्ये:

पायाभूत संख्या साक्षरता म्हणजे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी साध्या संख्यात्मक कल्पनांचा वापर करण्याची क्षमता. संख्या पूर्व व संख्या कल्पनेचा विकास, तुलना करण्याचे ज्ञान व कौशल्य, क्रमशः मांडणी करणे, आकृतीबंध / संरचना ओळखणे व त्याचे वर्गीकरण. या बाबी प्राथमिक वर्गात गणित अध्ययनाचा पाया घालतात.

प्रारंभिक गणिताचे दृष्टीकोन:

संख्या पूर्व:- गणन व संख्या ज्ञान

संख्या व संख्येवरील क्रिया:- दशमान पध्दतीचा वापर, संख्येवरील क्रियांवर प्रभुत्व संपादन करणे.

गणना करणे:- तीन अंकी संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितीय क्रिया करण्याच्या पद्धती समजावून घेणे व त्याचा उपयोग करणे.

आकार व अवकाश याबाबत समजून घेणे:- तीन अंकी संख्यांपर्यंतची सोपी आकडेमोड करुन

त्यांच्या विविध संदर्भातील दैनंदिन कार्यात उपयोग करणे

नमुना / संरचना:- आकार व अवकाशातील वस्तू समजून घेण्यासाठी संबंधित शब्द संग्रह शिकणे.

३. या अभियाना अंतर्गत राज्यातील ३ ते ९ वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सन २०२६ - २७ पर्यंत खालील किमान शैक्षणिक लक्ष्य निर्धारित करण्यात येत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area