Teacher Inter District Transfer Order

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली कार्यमुक्तीचे आदेश काढणेबाबत

दिनांक ०७/०४/२०१७ रोजी चा शासन परिपत्रक

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसंदर्भात दोन्ही जिल्हा परिषदांनी दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्राच्या अनुषंगाने कार्यमुक्तीचे आदेश काढणेबाबत.


जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने मध्यावधी बदल्या थांबविलेल्या होत्या तसेच बऱ्याच जिल्हा परिषदांकडून चुकीची कार्यपध्दती अनुसरून आंतरजिल्हा बदलीसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिली जात होती. त्यामुळे शासनाने डिसेंबर, २०१६ नंतर कोणत्याही शिक्षकाच्या आंतरजिल्हा बदलीसाठी ना हरकत प्रमाणपत्र न देणेबाबत शासनाने स्पष्ट आदेश दिलेले होते.

शासन स्तरावरून आता राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबतचा नव्याने धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहे. त्याबाबत लवकरच शासन स्तरावरून शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात येत आहे. आंतरजिल्हा बदलीसंदर्भात संबंधित शिक्षकाच्या कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेने तसेच ज्या जिल्हा परिषदेत त्याला रुजू व्हावयाचे आहे अशा दोन्ही जिल्हा परिषदानी ना हरकत प्रमाणपत्र दिलेले असल्यास नव्याने आंतरजिल्हा बदलीबाबत निश्चित करावयाच्या धोरणाचा भाग म्हणून अशा शिक्षकांना कार्यमुक्त करणे आवश्यक आहे. त्यास अनुसरुन पुढील कार्यवाही करण्याबाबत आपणास आदेशित करण्यात येत आहे.

१) ज्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरुन दोन्ही जिल्हा परिषदांनी म्हणजेच कार्यरत असलेल्या व बदलीने जाण्यास इच्छुक असलेल्या शिक्षकांना ज्या जिल्हा परिषदांनी दिनांक ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे अशाच शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरून कार्यमुक्तीचे आदेश दिनांक १५ एप्रिल २०१७ रोजी काढण्यात यावेत.

२) प्रत्येक जिल्हयाच्या मुख्य कार्यकारी अधिकान्यांनी त्यांच्या जिल्हयामध्ये हजर होणाऱ्या शिक्षकांची हजर होण्याबाबतचे आदेश तयार करून संबंधित शिक्षकास कार्यमुक्त करणाऱ्या जिल्हा परिषदेला उपरोक्त कालमर्यादित पाठविण्याची कार्यवाही करावी.

३) वरीलप्रमाणे अनुक्रमांक २ मध्ये नमुद केलेले आदेश प्राप्त झाल्यानंतर कार्यमुक्त करणाऱ्या जिल्हा परिषदांनी संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दि. २० एप्रिल २०१७ पर्यंत काढण्यात यावेत व या आदेशात प्रत्यक्षात कार्यमुक्तीचा दिनांक ८ मे, २०१७ रोजी असेल स्पष्टपणे नमुद करावे.. 

४) संबंधित शिक्षकांनी दिनांक ८ मे, २०१७ रोजी कार्यमुक्त झाल्यानंतर बदलीने हजर होण्याच्या जिल्हा परिषदेला तात्काळ रुजू होणे आवश्यक आहे. सदरची बदली विनंती बदली असल्याने त्यांना पदग्रहण अवधी वा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

शासन परिपत्रक डाऊनलोड करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area