Maharashtra SSC HSC Board Examination Copy Free Abhiyan

दहावी बारावी विद्यार्थ्यांबाबात शासन परिपत्रक निर्गमित ! आता कॉपी करणाऱ्या वर बसणार आळा| राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविणार

Board Exam Maharashtra

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत इयत्ता १२ वी ची परीक्षा दिनांक २१.०२.२०२३ ते दिनांक २१.०३.२०२३ रोजी होणार आहे

व इयत्ता १० वी ची परीक्षा दिनांक ०२.०३.२०२३ ते २५.०३.२०२३ रोजी घेण्यात येणार आहेत. 

कॉपीमुक्त अभियान

 सदर परिक्षांच्या कालावधीत परिक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पुर्ण राज्यात "कॉपीमुक्त अभियान" राबविण्यात येणार आहे. 


सदरचे अभियान सर्व विभागांनी निवडणुक अभियानाप्रमाणे सामुहिकरित्या राबवणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या परीक्षेदरम्यान पुढीलप्रमाणे कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात यावी.

१) राज्याचा नोडल अधिकारी म्हणून आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना व प्रत्येक जिल्हयातील जिल्हयाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच समन्वयक अधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच “कॉपीमुक्त अभियान" राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करावे. सदर अभियान यशस्वीपणे राबविणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

२) यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी.

३) परीक्षेच्या दरम्यान बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीसांनी परीक्षा कक्षामध्ये प्रवेश करुन नये. 

परीक्षा केंद्राच्या परीघीय भागामध्ये बंदोबस्ताचे काम पार पाडावे.

 ४) परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी अर्धा तास

अगोदर हजर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात याव्यात.

५) संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रिकरण (Video Shooting) करण्यात यावे.

Maharashtra SSC HSC Board Exam

६) जनजागृती मोहिम-

१) शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या कार्यशाळा आयोजित करणे. 

२) जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद यांची जिल्हा दक्षता समिती नियुक्त करणे.

३) माध्यमांव्दारे शाळा आणि पालकांशी संवाद साधावा.

७) पोलीस बंदोबस्त -

१) ५० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तीना प्रवेश नाही.

२) अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात यावे.

३) १९७३ च्या कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधकात्मक आदेश देण्यात यावेत.

४) ५० मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवावीत.

८) विद्यार्थ्यांची झडती -

१) १००% विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र प्रवेशावेळी झडती घ्यावी.

२) पोलीस पाटील, कोतवाल, शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून मुलांची तपासणी करण्यात यावी. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेच्या महिला कर्मचाऱ्यांकडून मुलींची तपासणी करावी.

९) महसूल विभागाची बैठी पथके-

१) पूर्णवेळ बैठे पथक नेमण्यात यावे.

२) परीक्षेआधी १ तास ते परीक्षेनंतर १ तास (उत्तरपत्रिका ताब्यात घेईपर्यत) ३) संवेदनशील परीक्षा केंद्रावर वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती ४) ज्याचे मुळ गांव व कामाचे ठिकाण एकच असल्यास त्यांना त्याठिकाणी नियुक्ती देण्यात येऊ नये. दररोज बदल करण्यात यावा.

१०) भरारी पथक -

१) प्रत्येक तालुक्यासाठी एक पथक.

२) विभाग प्रमुख - जिल्हाधिकारी कार्यालय/जिल्हा परिषद

३) अचानक तपासणीसाठी - पोलीसांची उपस्थिती, झडती, बैठे पथक


११) जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दौरे-

१) इंग्रजी, गणित आणि विज्ञान पेपरसाठी दिवस राखीव ठेवणे. 

२) सकाळी तिघांचा आपसात विचारविमर्श- आकस्मिक भेटी. 

३) प्रामुख्याने संवेदनशील तालुके आणि केंद्रांवर लक्ष

असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad