SSC HSC Students Good News Maharashtra Board Examination

दहावी व बारावी विद्यार्थ्याकरिता

आनंदाची बातमी|बोर्डाने घेतला

महत्त्वाचा निर्णय

Maharashtra SSC HSC Board Exam

 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षा


विद्यार्थ्यांना दिलासा

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.

इ. १० वी व इ. १२ वी च्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज पटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत.

अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत असल्याचे कळविण्यात आलेले आहे.

दहावी बारावी परीक्षेच्या पेपर सोडवण्याच्या वेळेत बदल….

 तथापि विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे

परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात येत आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून सकाळ सत्रात स. ११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु. ३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिका वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल

स. १०.३० वाजता तसेच दुपार सत्रात दु. २.३० वाजता परीक्षाव्यति परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

परीक्षेची सुधारित वेळ

१० वी व १२ वी साठी महत्त्वाचे

आता प्रत्येक पेपर लिहिण्यासाठी मिळणार १० मिनिटे वाढीव वेळ

प्रश्नपत्रिका मोबाईल वर व्हायरल होणाऱ्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा बोर्डाने रद्द केल्याचे या आधीच्या परिपत्रकात म्हटले होते. 

परंतु विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून आधीची कमी केलेली वेळ ही १० मिनिटांनी वाढविण्यात येणार आहे.


 लेखी पेपरची नवीन सुधारित वेळ खालीलप्रमाणे

 सकाळ सत्र -
स. ११ ते दु. २.१० (३ तासाचा पेपर)

स. ११ ते १.१० (२ तासाचा पेपर)

 दुपार सत्र-
दु. ३ ते ६.१० (३ तासाचा पेपर)
दु. ३ ते ५.१० (२ तासाचा पेपर)

यामुळे विद्यार्थ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad