Student Portal Aadhar Mismatch Update

Student Portal वर विद्यार्थी 

आधार मिसमॅच अशी करावी दुरुस्ती 

संच मान्यता 

शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ ची तात्पुरती संच मान्यता दिनांक १४.०६.२०२१ च्या शासन पत्रान्वये आधार क्रमांक असलेले विद्यार्थी गृहीत धरून करण्याचे निर्देश होते. 

त्यानुसार राज्यातील सर्व शाळांची तात्पुरती संच मान्यता दिनांक ३०.१२.२०२१ रोजीच्या आधार क्रमांक नोंद असलेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आलेली होती.

शासनाच्या संदर्भ क्रमांक ०२ च्या निर्देशान्वये दिनांक २८.०२.२०२२ चे पत्र रद्द करून सन २०२१-२२ च्या संच मान्यता या सन २०२०-२१ च्या संच मान्यता प्रमाणेच कायम ठेवाव्यात असे शासन आदेश आहेत. 

त्यामुळे सन २०२१-२२ च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी  लॉगीनला उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून आपण आपल्या स्तरावरून सर्व शाळांना वितरीत करण्याची कार्यवाही करावी.

तसेच आपल्या व शाळा स्तरावर Mis Match व Invalid Aadhar असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. 

तरी सदर विद्यार्थ्यांचे valid आधार क्रमांक तातडीने update करावे.

Student Portal

आधार मिसमॅच दुरुस्ती

Student Portal Aadhar Mismatch


      स्टुडंट पोर्टलवर आधार दुरुस्ती सुविधा सुरू झाली आहे.

1. प्रथम लॉगिन करा.

2. आधार मिस मॅच टॅब वर जा.

3. तेथून Report => Aadhar mismatch Status वर क्लिक करून  name mismatch/ किंवा ज्यात आपले विद्यार्थी असतील त्यावर क्लिक करा.

4. विद्यार्थी यादी ओपन होईल. 

प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावापुढे unfreez टॅब आलेली दिसेल त्यावर क्लिक करा

5. नवीन विंडो ओपन होईल. 

नवीन विंडो ओपन होताना Error आला तर ती क्लोज करून पुन्हा Report => Aadhar mismatch Status वर क्लिक करून name mismatch/ किंवा ज्यात आपले विद्यार्थी असतील त्यावर क्लिक करा.

6. विद्यार्थ्याच्या नावासमोर update टॅब येईल.

7. Update वर क्लिक करा.

8. आधार दुरुस्ती करून save करा.

9. विद्यार्थ्यांची माहिती अपडेट झाल्यावर विद्यार्थ्याचे नाव दिसणार नाही हे पहावे

(Student portal Mozilla Firefox वर व्यवस्थित सुरू आहे.)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad