एकात्मिक पाठ्यपुस्तक संदर्भात
प्रतिसाद नोंदविण्याबाबत
पुणे :- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे यांच्या माध्यमातून वह्यांच्या पानांचा समावेश करून इयत्ता १ली ते ८वी साठी मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू या माध्यमांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तके तयार केलेली आहेत. दिनांक ८ मार्च २०२३च्या शासन निर्णयानुसार या पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पृष्ठांबाबतची उपयोगिता व यशस्विता तपासण्यासाठी ही लिंक तयार करण्यात आलेली आहे. या लिंकवर शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी प्रश्नावली उपलब्ध आहे. या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपण आपले प्रतिसाद नोंदवावेत ही विनंती.
ही लिंक ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२२/ प्र.क्र.२१६/एसडी- ४ दिनांक: ०८ मार्च २०२३ अन्वये पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पृष्ठे सामाविष्ट केली आहेत.
पहिली ते आठवीपर्यंतची ही पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरूपांत मराठी, उर्दू, हिंदी व इंग्लिश माध्यमांच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे या पाठ्यपुस्तकांची 'यशस्विता' तपासणे आवश्यक आहे. या उद्देशाने ही प्रत्याभरण लिंक बालभारतीने शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. या लिंकवर आपले प्रतिसाद नोंदवावेत तसेच इतरांनाही या कामी प्रोत्साहित करावे.
ही लिंक दिनांक ३१/१०/२०२३ पर्यंत उपलब्ध राहणार आहे.
ebalbharati.in या बालभारतीच्या संकेतस्थळावर (website) वर सदर लिंक ऊपलब्ध आहे.
खालील लिंक वर क्लिक करा
प्रतिसाद नोंदणी
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ
'बालभारती', सेनापती बापट मार्ग, पुणे ४११ ००४
What's Up Group Join
What's Up Group Join
Good
ReplyDeleteYes it is a very nice idea
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना