Summer Vacation Has Been Announced For Schools In Maharashtra State

राज्यातील शाळांना उन्हाळ्याची 

सुट्टी जाहीर! शासन परिपत्रक 

निर्गमित !! वाचा सविस्तर 

पुणे :-  उन्हाळी सुट्टी दिनांक 2 मे 2024 पासून

दिनांक 15 जुन 2024 रोजी शाळा सुरू होणार

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2024-2025 सुरु करणेबाबत

संदर्भ : शासन परिपत्रक क्रःसंकिर्ण-2023/प्र.क्र. 105/एस.डी.4, दि. 20/04/2023.

खुशखबर उन्हाळी सुट्टी 

उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. 

या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुटटी व शेक्षणक वर्ष 2024-25 सुरु करणेबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

1. राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार, दिनांक 02 में, 2024 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

2. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सूटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.

3. पुढील शैक्षणिक वर्ष सन 2024-2025 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा

शनिवार दिनांक 15 जून, 2024 रोजी सुरु करण्यात याव्यात.

 4. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा 30 जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार दिनांक 01 जुलै, 2024 पासून सुरु करण्यात याव्यात.

वरील सूचना आपल्या अधिनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.

शिक्षण संचालनालय 

शिक्षण संचालक 

What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

What's Up Group Join 

संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक - २ (PAT-३)

➤ खालील लिंक वर क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad